घरक्रीडाआयसीसीच्या घोळामुळे दोन तासांत झालं होत्याचं नव्हतं, भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी

आयसीसीच्या घोळामुळे दोन तासांत झालं होत्याचं नव्हतं, भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी

Subscribe

भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीच्या एका चुकीमुळे दोन तासांतच होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आयसीसीने आज दुपारी दीड वाजता कसोटी संघाची ताजी क्रमवारी जारी केली. तेव्हा आयसीसीने भारतीय संघाला नंबर-१ घोषित केले होते. मात्र, दोन तासानंतर पुन्हा एकदा ४ वाजताच्या दरम्यान आयसीसीने भारतीय संघाची घोषणा करत नंबर-२ च्या स्थानावर असल्याचं सांगितलं.

या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघाने १२६ रेटिंगसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर भारतीय संघ ११५ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसीच्या वेबसाईटमध्ये घोळ झाल्यामुळे भारतीय संघाचं स्थान पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या स्थानी आलं. मात्र, या घोळानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ हे सध्या कोणत्याही कसोटी मालिकेचा भाग नाहीत. पुढील महिन्यात उभय संघांमध्ये सामने होणार आहेत. फेब्रवारी-मार्चमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरोधात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या आधीच्या मालिकेतही भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं होतं. चार कसोटींच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला क्लिन स्वीप देत ११२ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला होता.

टी-२० क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. त्याचवेळी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ ११० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. येत्या १८ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आनंदी राहण्यासाठी.., सेक्सटिंगच्या आरोपानंतर बाबर आझमचं पहिलं ट्विट व्हायरल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -