घरक्रीडाIND vs AUS : टीम इंडियाला धक्का; थ्रो-डाऊन स्पेशालिस्टला कोरोना 

IND vs AUS : टीम इंडियाला धक्का; थ्रो-डाऊन स्पेशालिस्टला कोरोना 

Subscribe

डी रघुवेंद्रचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. यंदा युएईमध्ये होत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला पार पडणार असून त्यानंतर भारतीय खेळाडू थेट ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सोमवारी भारताचे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० असे तिन्ही संघ जाहीर झाले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट डी रघुवेंद्रला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागणार

भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे इतर सदस्य काही दिवसांपूर्वी दुबईत दाखल झाले. युएईमध्ये आल्यावर या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. टीम इंडियाचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट डी रघुवेंद्रचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागणार आहे. रघुवेंद्र गेली बरीच वर्षे भारतीय संघाचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहे. तो साधारण १५०-१५० किमीच्या वेगाने चेंडू फेकू शकतो. याचा फायदा भारताच्या फलंदाजांना होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमी त्याचे कौतुक करतो. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजीला अनुकूल मानले जातात. त्यामुळे ऑस्ट्रेलियात त्याची उणीव भारतीय संघाला भासेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -