भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा निश्चित; कर्णधारपदी लोकश राहुल?

कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास राहुल तयार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा निश्चित झाला आहे. पुढील महिन्यात हा दौरा होणार असून कर्णधारपदाची धुरा लोकश राहुलकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर झिम्बाब्वे दौरा होणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.

भारतीय संघाने आताच इंग्लंडदौरा केला. या दौऱ्यात एक कसोटी सामना, ३ टी-ट्वेन्टी मालिका आणि ३ एकदिवसीय सामने झाले. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजबरोबर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने, पाच टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापैकी पहिला एकदिवसीय सामना येत्या शुक्रवारी (२२ जुलै) होईल. तर, २९ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत टी-ट्वेंन्टीचे पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, यातील दोन सामने अमेरिकेत खेळविण्यात येणार आहेत.

हेही वाचा – कोस्टल रोडच्या कामाला वेग, ५८ टक्के काम पूर्ण

या दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिथे उभय संघांदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यातील पहिला सामना १८ ऑगस्टला, दुसरा सामना २० ऑगस्टला तर, तिसरा सामना २२ ऑगस्टला होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा आणि शिखर धवन यांना विश्रांती देण्यात येईल आणि त्यामुळ कर्णधारपदाची जबाबदारी लोकेश राहुलकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

क्रिकेटच्या क्रमवारीत झिम्बाब्वे १३पैकी १२व्या स्थानी आहे. १५ सामन्यांमध्ये या संघाने केवळ तीन विजय नोंदवले आहेत. आता तब्बल सहा वर्षांनी भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी २०१६ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतीय संघ तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळला होता.

हेही वाचा – उपेक्षित समाजाला ताकद देण्यासाठी आरक्षण हवेच; जितेंद्र आव्हाड यांची भूमिका