घर क्रीडा भारताच्या एकता बिस्तची दमदार कामगिरी; हॅटट्रिकसह घेतल्या 7 विकेट्स

भारताच्या एकता बिस्तची दमदार कामगिरी; हॅटट्रिकसह घेतल्या 7 विकेट्स

Subscribe

भारताची दमदार फिरकीपटू एकता बिश्त हिने कमी धावा देत 7 गडी बाद केल्याची दमदार कामगिरी केली आहे. भारतात महिला वरिष्ठ टी-20 चॅम्पियनशिपही खेळवली जात आहे.

भारताची दमदार फिरकीपटू एकता बिश्त हिने कमी धावा देत 7 गडी बाद केल्याची दमदार कामगिरी केली आहे. भारतात महिला वरिष्ठ टी-20 चॅम्पियनशिपही खेळवली जात आहे. या स्पर्धेत एकता बिश्तने 4 षटकांत 7 गडी घेण्याचा विक्रम केला. (indian cricketer ekta bisht takes 7 wickets of 8 runs including hat trick senior womens t20 trophy)

उत्तराखंड संघाकडून खेळताना डावखुरी फिरकीपटू एकता हिने 7 गडी बाद केले. तसेच, एकता बिश्त हिने 24 चेंडूत म्हणजेच सामन्यातील तिच्या 4 षटकांत झारखंडचे 7 फलंदाज बाद केले. विशेष म्हणजे एकता बिश्तने चार षटकात केवळ 8 धावाच दिल्या. तिच्या 24 चेंडूंपैकी 19 चेंडू हे चक्क निर्धाव होते. एकताने यामध्ये एक हॅट्ट्रिक देखील घेतली आहे. सामन्याच्या 19व्या षटकात एकताने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर शुभ, देवयानी आणि प्राजक्ता यांची विकेट घेतली. या षटकांत तिने एकूण ४ विकेट घेतल्या.

- Advertisement -

एकता बिश्तच्या या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर उत्तराखंडने अवघ्या 107 धावांनी सामना जिंकला. झारखंडचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत केवळ 97 धावांत गारद झाला आणि उत्तराखंडने 10 धावांनी सामन्यात विजय मिळवला.

- Advertisement -

एकता बिश्तने सर्वात आधी रुमाला 15 धावांवर बाद केले. त्यानंतर पाटील आणि मोनिका दोघींना एकाच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर तिच्या अंतिम षटकात तिने 4 विकेट घेतल्या. त्यात हॅटट्रिकचा समावेश होता. शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बिश्तने निहारिका माघारी पाठवले त्यानंतर हॅटट्रिक घेत सामन्यात मोलाची भूमिका बजावली.


हेही वाचा – पवार, शेलार पॅनलचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -