Eco friendly bappa Competition
घर क्रीडा हार्दिक-नताशाने दिली गुड न्यूज; सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर

हार्दिक-नताशाने दिली गुड न्यूज; सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर

Subscribe

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविच यांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. नताशा गर्भवती असून ही बातमी स्वतः हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या दोघांचा एक खास फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या वर्षात २०२० च्या सुरूवातीला म्हणजेच १ जानेवारी रोजी या दोघांनी आपल्या नात्याबाबत एक फोटो करून बातमी दिली होती. त्यांनी साखरपुड्याचा फोटो शेअर केला होता. आता पुन्हा एकदा हार्दिकने गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

- Advertisement -

हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यास उत्साहित असल्याचं त्याने लिहिलं आहे. यासोबतच एका पारंपारिक सोहळ्याचेदेखील फोटो त्याने शेअर केले. ज्यामध्ये हार्दिक आणि नताशा या दोघांच्या गळ्यामध्ये वरमाला दिसत आहेत. ‘नताशा आणि माझा इथपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता आणि आता आम्ही लवकरच आमच्या जीवनात नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत’, अशी हार्दिकने फोटोसोबत पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा –

- Advertisement -

संगीतकार वाजिद खान यांचे निधन

- Advertisment -