Homeक्राइमCrime : माजी क्रिकेटरच्या वडिलांनी 34 बनावट खात्यांमधून घातला 1.25 कोटींचा गंडा;...

Crime : माजी क्रिकेटरच्या वडिलांनी 34 बनावट खात्यांमधून घातला 1.25 कोटींचा गंडा; आता 7 वर्षांची शिक्षा

Subscribe

न्यायालयाच्या आदेशामुळे मध्य प्रदेशचा क्रिकेटपटू नमन ओझाच्या वडिलांना 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर 14 लाखांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.

बैतूल : जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत सुमारे 1.25 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना 2013 साली समोर आली होती. 11 वर्षे जुन्या प्रकरणात मुलताईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आता शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे मध्य प्रदेशचा क्रिकेटपटू नमन ओझाच्या वडिलांना 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर 14 लाखांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. (Indian cricketer Naman Ojha father sentenced to 7 years in prison)

2013 च्या प्रकरणात विनय ओझा याला अटक करण्यात आली होती. मात्र फसवणूक आणि इतर संबंधित कलमांखाली 2014 मध्ये एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर विनय ओझा हा फरार होता. यानंतर त्याला 2022 मध्ये बेतूल पोलिसांनी इंदूर जिल्ह्यातून अटक केली होती. अहवालानुसार, विनय ओझा याने 34 बनावट खाती उघडून फसवणूक केली आणि किसान क्रेडिट कार्डवरून घेतलेले कर्ज त्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते. बनावट खात्यांमधून अंदाजे 1.25 कोटी रुपये काढण्यात आले होते. याप्रकरणी कलम 409 आणि 120 बी अंतर्गत अंतर्गत 7 वर्षे तुरुंगवासाची आणि 7 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Cyber Crime : सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍यास अटक; मालाडच्या जोडप्याला 36 लाखांचा गंडा

अभिषेक रत्नमसह तिघांनाही तुरुंगवास 

न्यायालयाने या प्रकरणात आणखी एक तत्कालीन व्यवस्थापक अभिषेक रत्नम यालाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून मोठा दंड ठोठावला आहे. तर याचप्रकरणात अन्य दोन आरोपी धनराज आणि लखनलाल पवार यांनाही प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी सर्व दोषींना तुरुंगात पाठवले आहे.

- Advertisement -

नमन ओझाची कारकीर्द

दरम्यान, 41 वर्षीय नमन ओझा भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने एक कसोटी, एक वनडे आणि 2 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 56 धावा, एकदिवसीय सामन्यात एक आणि टी-20 मध्ये 12 धावा आहेत. तसेच नमन ओझा आयपीएल देखील खेळला आहे. त्याने 2009 ते 2018 पर्यंत आयपीएलमध्ये 113 सामने खेळताना 6 अर्धशतकांच्या मदतीने 1554 धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Khalistani Terrorist : खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकार्‍याला मानखुर्द येथून अटक; एनआयएची कारवाई


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -