घरक्रीडाराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय सायकलपटू मीनाक्षीला अपघात; स्ट्रेचरवरून नेल्याने प्रेक्षकांमध्ये भीती

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय सायकलपटू मीनाक्षीला अपघात; स्ट्रेचरवरून नेल्याने प्रेक्षकांमध्ये भीती

Subscribe

बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू आक्रमक खेळी करताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारताने तीन पदके जिंकली आहेत. मात्र, एकिकडे भारतीय खेळाडू उत्तम खेळी करताना पदकांची संख्या वाढवत आहेत, तर दुसरीकडे एका भारतीय खेळाडूला स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू आक्रमक खेळी करताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारताने तीन पदके जिंकली आहेत. मात्र, एकिकडे भारतीय खेळाडू उत्तम खेळी करताना पदकांची संख्या वाढवत आहेत, तर दुसरीकडे एका भारतीय खेळाडूला स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यानुसार, भारतीय सायकलपटू मीनाक्षी हिला अपघात झाला. या अपघातानंतर तिला स्ट्रेचरवर बसवून मैदानावर बाहेर नेण्यात आले. (indian cyclist meenakshi accident in commonwealth games 2022 video rival)

मीनाक्षीच्या सायकलला अपघात

- Advertisement -

राष्ट्रकुल स्पर्धेच्या महिलांच्या १० मीटरच्या सायकलिंग स्केच रन प्रकारात मीनाक्षीच्या सायकलला अपघात झाला. या स्पर्धेदरम्यान मीनाक्षी वळण घेताना तिची सायकल अडकली आणि त्यात मिनाक्षी खाली पडली. यावेळी ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिच्या पाठीमागून वेगाने येणाऱ्या न्यूझीलंडच्या प्रतिस्पर्ध्याची ब्रायोनी बोथाची सायकल तिच्या अंगावरून गेली. यात ब्रायोनी बोथालाही दुखापत झाल्याचे समजते.

सायकलपटू मीनाक्षीच्या अपघातानंतर उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अपघातास्थळी धाव घेतली. त्यानंतर मीनाक्षी आणि बोथाला मैदानातून बाहेर नेले. त्यांनी मीनाक्षीला स्ट्रेचरवरून नेले. हा सगळा प्रकार पाहून मैदानातील प्रेक्षकही चिंतेत पडले.

- Advertisement -

भारत एकूण 9 पदकांसह सहाव्या क्रमांकावर

मीनाक्षीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकतालिकेत भारत एकूण 9 पदकांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. ज्युदो खेळातही भारताने दोन पदकांना गवसणी घातली आहे. सुशीला देवी लिकमाबम हीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या मायकेला व्हाइटबूईने तिला मात दिल्यामुळे सुशीलाचे सुवर्णपदक निसटले. तसेच, विजय कुमार याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.


हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोत भारताच्या सुशीला देवीने पटकावले रौप्यपदक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -