भारताचा माजी खेळाडू आणि सचिन तेंडुकरचा ‘हा’ खास मित्र जगतोय हलाखीचे जीवन

भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास मित्र विनोद कांबळी सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. विनोद कांबळी याच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास मित्र विनोद कांबळी सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. विनोद कांबळी याच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी आणि कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी विनोद कांबळीने मैदानावर कोणतेही काम करण्याची तयारी दाखवली आहे. (Indian former cricketer and sachin tendulkar friend vinod kambli facing financial crisis)

विनोद कांबळी याच्याकडे बीसीसीआयकडून मिळणारे 30 हजार रुपयांचे पेन्शन हेच एकमेव उत्पन्न आहे. मात्र या व्यतिरिक्त विनोदकडे उत्पन्नाचे माध्यम नाही. त्यामुळे त्याने मैदानावर कोणतेही काम करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. बोर्डाकडून मिळणाऱ्या या मदतीसाठी विनोद आभार व्यक्त करतो.

विनोद कांबळे याच्या सध्यस्थितीची सर्वत्र चर्चा केली जात आहे. त्याचे कारण म्हणजे, कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी मैदानावर कोणतेही काम करण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. विनोदचे सध्या 50 वर्षांचा असून त्याला चाहतेही आता ओळखणार नाहीत. कारण पांढरी दाढी, डोक्यावर टोपी अशी विशेष ओळख असलेला विनोद एमसीए कॉफी शॉपमध्ये आला तेव्हा फार बारीक झालेला दिसला. त्यावेळी विनोदच्या गळ्यात सोन्याची चेन नव्हती. हातात ब्रेसलेट आणि मोठे घड्याळही नव्हते. शिवाय त्याच्या मोबाइलची स्क्रीन देखील खराब झाली होती.

दरम्यान, भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र होते. या दोघांनीही एकाच शाळेत शिक्षण घेतले असून, स्वर्गीय रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय संघात पदार्पण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आपली छाप पाडली होती. विनोद कांबळी याने करिअरच्या पहिल्या 7 सामन्यात 793 धावा करून खळबळ उडवली होती. 1993 मध्ये 113.29 च्या स्ट्राइक रेटने कसोटी धावा केल्या होत्या.

भारताकडून विनोद कांबळीने 2000 साली अखेरचा सामना खेळला होता. केवळ 17 सामन्यानंतर विनोद कांबळी संघाबाहेर पडला होता. वयाच्या 23 व्या वर्षी विनोदने अखेरची कसोटी खेळली होती. त्याची सरासरी 54 होती.


हेही वाचा – आयसीसी ODI क्रमवारीत पाकिस्तानला फायदा; बाबर आझम फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल