घरक्रीडाकोरियाचे आवाहन पेलण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ सज्ज

कोरियाचे आवाहन पेलण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ सज्ज

Subscribe
भारतीय महिला हॉकी संघ पाचवी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत यजमान दक्षिण कोरिया संघाशी लढणार आहे. हा अंतिम सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. कोरियातील सनराईझ स्टेडीयमवर हा सामना खेळला जाणार आहे. सुनीता लाक्राच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आतापर्यंतच्या सामन्यात विजयी ठरला आहे. भारतीय संघाने जपानला ४-१, चीनला ३-१ आणि मलेशियाला ३-२ ने हरवले आहे. यावेळी भारतीय संघाची लढत ही विश्वतील नवव्या क्रमांवर असलेल्या दक्षिण कोरियाच्या संघाविरुद्ध होणार आहे. आज (शनिवारी) या दोन्ही संघामध्ये सराव लढत असून रविवारी अंतिम लढत होणार आहे.
  
दक्षिण कोरियाचे होम ग्राउंड म्हणून सनराईझ मैदानाला ओळखले जाते. घरच्या मैदानावरच कोरिया संघाला नमवणे, हे भारतीय संघासमोर मोठे आव्हान आहे. द. कोरिया संघाने आतापर्यंत मलेशिया आणि चीनच्या संघाला हरवलेले आहे. जपान सोबत झालेल्या सामन्यात १-१ ने बरोबरी केली होती. 

द. कोरिया संघाच्या तयारी बाबत माहिती देताना संघाच्या प्रशिक्षक सोर्ड मारिन यांनी सांगितले की, “कोरिया एक चांगला संघ आहे, आमचा संघ या चॅम्पियन्स ट्रॉफीत पूर्ण आत्मविश्वासाने खेळत आहे. होम ग्राउंड असल्यामुळे आम्ही बिनधास्त आहोत. मात्र आम्ही फक्त आमच्या खेळाकडे लक्ष देत आहोत. सराव सामन्यात भारत कशाप्रकारे खेळतो याची महिती आम्हाला मिळेल. सराव सामन्यात जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता नसून, उरलेली ताकद आम्हाला अंतिम सामन्यासाठी जपून ठेवावी लागेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -