Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडीची विजयी सुरुवात

पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडीची विजयी सुरुवात

Subscribe

इंडियन ओपन बॅडमिंटन

भारताची जोडी अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत चिनी जोडी वेनमेई ली आणि यु झेंगचा पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डीने वेनमेई ली आणि यु झेंग या जोडीला २२-२०, २१-१९ असे पराभूत केले. या सामन्याचे दोन्ही गेम खूपच रंगतदार झाले. पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्यांनी चांगला खेळ केल्यामुळे या गेममध्ये २०-२० अशी बरोबरी होती. मात्र, पुढील २ गुण मिळवत भारतीय जोडीने हा गेम जिंकला.

दुसर्‍या गेममध्येही मोक्याच्या क्षणी पोनप्पा-सिक्की रेड्डीने आपला खेळ उंचावत हा गेम २१-१९ असा जिंकत हा सामनाही जिंकला. तसेच पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीत १६ खेळाडूंपैकी १३ खेळाडू हे भारतीय होते. यामधील राहुल यादव चित्तबोइना, सिद्धार्थ ठाकूर, कार्तिक जिंदल आणि कार्तिकेय गुलशन कुमार यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत रितिका, प्राशी जोशी, रिया मुखर्जी आणि वैदेही चौधरी यांना मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य फेरीत प्राशी जोशीचा सामना तिसर्‍या सीडेड हि बिन्गजियोशी होणार आहे. तसेच पुरुष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि शिवम शर्मा यांनी मुख्य फेरी गाठली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -