घरCORONA UPDATECoronaEffect: यंदाचे IPL सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले; BCCI चा निर्णय

CoronaEffect: यंदाचे IPL सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले; BCCI चा निर्णय

Subscribe

दरवर्षी मोठ्या दिमाखात खेळला जाणारा आयपीएल सामना यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

जगभरात कोरोनाचे संकट असताना त्याचे सावट आता खेळांवरही पडले आहे. दरवर्षी मोठ्या दिमाखात खेळला जाणारा आयपीएल सामना यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. यंदाच्या वर्षी इंडियन प्रिमिअर लीग २०२० (आयपीएल) चा हंगाम २९ मार्च ते २४ मे दरम्यान पार पडणार होता. मात्र जगभरात पसरलेले कोरोनाचे संकट भारतातही घोंगावले आणि सर्व यंत्रणा ठप्प झाल्या. त्यामुळे आयपीएलचे सामनेही नियोजित वेळापत्रकानुसार झाले नाहीत. त्यामुळे आज बीसीसीआयने यासंबंधी अनिश्चित काळासाठीच्या स्थगितीची घोषणा केली आहे.

हेही वाचा – कुत्र्यामार्फतही पसरु शकतो कोरोनाचा विषाणू

- Advertisement -

बीसीसीआयची महत्त्वाची बैठक पार 

यासंबंधी काल बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. यामध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कोषाध्यक्ष अरुण धुमल आणि आयपीएलचे मुख्य परिचालन अधिकारी हेमंग अमीन हे उपस्थित होते. यापूर्वी १५ एप्रिल आणि नंतर ३ मे पर्यंत आयपीएलचे सामने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे स्थगित करण्यात आले होते.

- Advertisement -

ऑलिम्पिक स्पर्धाही रद्द 

दरम्यान, कोविड १९ या जागतिक महामारीचा ऑलिम्पिक स्पर्धांवरही परिणाम पाहायला मिळाला. ही स्पर्धादेखील यंदाच्या वर्षी होणार नसून पुढील वर्षी याचे आयोजन करण्याचे सांगितले गेले आहे. सुरूवातील या स्पर्धेतून कॅनडाने माघार घेतली होती. या स्पर्धेसाठी जगातून स्पर्धक येणार असल्यामुळे तिथे आमच्या खेळाडूंना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने आम्ही तूर्तास समर ऑलिम्पिक २०२० ला खेळाडू न पाठवण्याचा निर्णय घेतला असून टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकबाबतही आमचा असाच विचार असू शकतो, असे कॅनेडियन ऑलिम्पिक कमिटी आणि कॅनेडियन पॅरा ऑलिम्पिक कमिटीने माघार घेताना म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -