घरक्रीडाऑक्टोबरमध्ये आयपीएल अवघड, सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होऊ शकेल!

ऑक्टोबरमध्ये आयपीएल अवघड, सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होऊ शकेल!

Subscribe

 सुनील गावस्करांचे मत

करोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु, सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा श्रीलंकेत होऊ शकेल असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना वाटते. तसेच ऑस्ट्रेलियात ४० हजार आसनक्षमता असलेल्या स्टेडियममध्ये १० हजार प्रेक्षकांना उपस्थित राहण्याला परवानगी असल्याची घोषणा शुक्रवारी ऑस्ट्रेलियन सरकारने केली. ऑस्ट्रेलियात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने ऑक्टोबर महिन्यात तिथे टी-२० विश्वचषक स्पर्धा होऊ शकते असेही मत गावस्कर यांनी व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या घोषणेनंतर, ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक होण्याची शक्यता वाढली आहे. कदाचित संघांना तीन आठवडेआधी ऑस्ट्रेलिया गाठावे लागेल. त्यानंतर १४ दिवस त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि सात दिवस ते सराव करु शकतील. टी-२० विश्वचषक रद्द झाल्याशिवाय आयपीएल स्पर्धेचे आयोजन करता येणार नाही. परंतु, ऑस्ट्रेलियन सरकारच्या घोषणेनंतर ऑक्टोबरमध्ये आयपीएलचे आयोजन अवघड वाटत आहे. सप्टेंबरमध्ये भारतात पाऊस असल्याने इथे आयपीएल होऊ शकत नाही. परंतु, सप्टेंबरच्या सुरुवातीला श्रीलंकेत ही स्पर्धा होऊ शकेल. आठही संघ एकमेकांविरुद्ध दोन ऐवजी एक-एक सामनाच खेळतील, असे गावस्कर म्हणाले. तसेच प्रेक्षकांविना सामने खेळणे खेळाडूंना थोडे वेगळे वाटेल असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -