घरक्रीडाIPL 2021: आता स्टेडियममध्ये बसून घेता येणार लाईव्ह मॅचचा आनंद; BCCI...

IPL 2021: आता स्टेडियममध्ये बसून घेता येणार लाईव्ह मॅचचा आनंद; BCCI चा निर्णय

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या दुसऱ्या सिझनला १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असतानाच प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सिझनमधील सामने प्रेक्षकांना लाईव्ह स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहेत. त्यामुळे जवळपास २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांना लाईव्ह सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र स्टेडियममध्ये मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल, असे बीसीसीआयने म्हटलं आहे.

बीसीआयने बुधवारी (१५ सप्टेंबर) आयपीएलच्या वेबसाइटवरन यासंदर्भातील घोषणा केली आहे. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल. मागील सामन्यात तीन वेळा चॅम्पियन चेन्नईचा पराभव केला.

- Advertisement -

कोरोनामुळे (Coronavirus) यापूर्वी पहिल्या टप्प्यात आयपीएल पाहण्यासाठी स्टेडियमध्ये येण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी नव्हती. इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली. मात्र कोरोनाचे वाढते संकट पाहता २ मे रोजी आयपीएलटे सामने स्थगित करण्य़ात आले. यावेळी २९ सामने खेळवण्यात आले. मात्र ३१ सामने शिल्लक राहिले. दरम्यान आता बीसीसीआयने हे उर्वरित ३१ सामने युएईत १९ सप्टेंबरपासून सुरु होतील.

आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार, प्रेक्षक १६ सप्टेंबरपासून स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांची तिकिटे खरेदी करु शकतात. www.iplt20.com तसेच PlatinumList.net या वेबसाईटवर तिकिटे खरेदी करु शकतात. या स्पर्धेचे उर्वरित सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळले जाणार आहेत. मात्र यादरम्यान कोरोनासंबंधीत नियम आणि यूएई सरकारचे नियम लक्षात घेऊन मर्यादित जागांसाठी तिकिटे विकली जातील.

- Advertisement -

या दुसऱ्या टप्प्यात दुबईमध्ये चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना होईल त्यानंतर कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामना अबुधाबीमध्ये होणार आहे. तर २४ सप्टेंबर रोजी शारजामध्ये आरसीबी आणि चेन्नई यांच्यात सामना होणार आहे. यात दुबईमध्ये १३, शारजाहमध्ये १० आणि अबू धाबीमध्ये ८ सामने खेळले जातील.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -