घरक्रीडापी. व्ही. सिंधूने रचला इतिहास; बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावले

पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास; बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावले

Subscribe

१८ व्‍या आशियाई क्रिडा स्‍पर्धेत पी.व्‍ही. सिंधुने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बॅडमिंटनमध्‍ये सिंधूने रौप्‍य पदक पटकावले आहे. बॅडमिंटनच्या सामन्यामध्ये २३ वर्षाच्या पी. व्ही. सिंधूचा जरी पराभव झाला असला तरी तिने इतिहास रचला आहे.

जकार्तामध्ये सुरु असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० व्या दिवशी देखील भारताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या पी. व्ही सिंधूने रौप्य पदक पटकावले आहे. महिला एकेरी स्पर्धेत अंतिम सामन्यात चीनच्या ताई जू युंगने सिंधूचा पराभव केला. ताई जू युंगने २१-१३, २१-१६ असा सिंधूचा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पी व्ही सिंधू पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचे हे बॅडमिंटन स्पर्धेतील १० वे पदक आहे.

- Advertisement -

पी व्ही सिंधूने इतिहास रचला

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज झालेल्या बॅडमिंटनच्या सामन्यामध्ये २३ वर्षाच्या पी. व्ही. सिंधूचा जरी पराभव झाला असला तरी तिने इतिहास रचला आहे. पी. व्ही. सिंधू आशियाई क्रीडास्पर्धेत बॅडमिंटनमध्ये ५६ वर्षाच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये १९६२ मध्ये बॅडमिंटन खेळाचा समावेश करण्यात आला होता.

‘पी. व्ही सिंधूच्या कामगिरीवर मी खूप आनंदी आहे. तिने शेवटपर्यंत लढा दिला. तिला येत्या काळात अजून मोठ मोठे सामने खेळायचे आहे. त्यासाठी तिला आणखी मेहनत करावी लागेल.’ – पी. व्ही. रमण, सिंधूचे वडील

- Advertisement -

पहिले रौप्य पदक पी व्ही सिंधूने भारताला मिळवून दिले

आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत भारताला मिळालेल्या एकूण १० पदकांपैकी पहिले रौप्य पदक आज पटकावले आहे. अजून सुवर्ण पदक मिळवण्याच्या प्रतिक्षेत भारत आहे. सायना नेहवालचा सोमनारी महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला. यामध्ये सायनाने कांस्य पदक पटकावले आहे.

आशियाई स्पर्धेत भारताला मिळालेली पदक खालिलप्रमाणे –

१. महिला एकेरी स्पर्धा – रौप्य पदक – पी व्ही सिंधू (२०१८ – जकार्ता)

२. महिला एकेरी स्पर्धा – कांस्य पदक – सायना नेहवाल (२०१८ – जकार्ता)

३. पुरुष एकेरी स्पर्धा – कांस्य पदक – सैय्यद मोदी (१९८२ – दिल्ली)

४. पुरुष दुहेरी स्पर्धा – कांस्य पदक – लेरॉय आणि प्रदीप गांधे (१९८२ – दिल्ली)

५. पुरुष टीम – कांस्य पदक (१९७४ – तेहरान)

६. पुरुष टीम – कांस्य पदक (१९८२ – दिल्ली)

७. पुरुष टीम – कांस्य पदक (१९८६ – सिओल)

८. महिला टीम – कांस्य पदक (१९८२ – दिल्ली)

९. महिला टीम – कांस्य पदक – (२०१४ – इंचियोन)

१०. मिक्स्ड दुहेरी – लेरॉय आणि कंवल ठाकर सिंह – कांस्य पदक (१९८२ – दिल्ली)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -