घरक्रीडा'आम्ही पाकिस्तानचा सन्मान करतो…'; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना अश्विनचे...

‘आम्ही पाकिस्तानचा सन्मान करतो…’; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना अश्विनचे प्रत्युत्तर

Subscribe

हा क्रिकेटचा गेम आहे असून, आम्ही पाकिस्तान विरुद्ध फार क्रिकेट खेळत नाही. स्पर्धा खूप मोठी आहे. दोन्ही देशातील जनतेसाठी ती महत्त्वाची आहे. हार आणि जीत हा खेळाचा भाग असून, खासकरुन या फॉर्मेटमध्ये जय-पराजयाच अंतर खूप कमी असते.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी विश्वचषकात पाकिस्तानला आधी ‘अंडरडॉग’ मानले जात होते. पण आता परिस्थिती बदलू लागली असून भारतीय संघही पाकिस्तानी संघाचा आदर करू लागला आहे असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी केले होते. यावर भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांने प्रत्युत्तर दिले आहे. (indian spinner r ashwin answer on ramiz raza ind vs pak 2022 t20 world cup)

“हा क्रिकेटचा गेम आहे असून, आम्ही पाकिस्तान विरुद्ध फार क्रिकेट खेळत नाही. स्पर्धा खूप मोठी आहे. दोन्ही देशातील जनतेसाठी ती महत्त्वाची आहे. हार आणि जीत हा खेळाचा भाग असून, खासकरुन या फॉर्मेटमध्ये जय-पराजयाच अंतर खूप कमी असते. संघ म्हणून आम्ही पाकिस्तानचा आदर करतो. ते सुद्धा आमचा आदर करतात”, असे अश्विनने म्हटले.

- Advertisement -

भारतीय संघ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील सामन्यानंतर अश्विन पत्रकार परिषदेत बोलत होता. “वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगला सामना झाला. टुर्नामेंटमधील पहिला सामना खेळताना तुम्हाला परिस्थितीची माहिती असली पाहिजे. प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला. पर्थमध्ये खेळपट्टीचा बाऊन्स आणि वेगाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये टीम इंडिया आहे. नव्या युवा खेळाडूंना याचा फायदा होईल”, असे अश्विन याने म्हटलं.

विश्वचषकात पाकिस्तानला आधी ‘अंडरडॉग’ मानले जात होते, पण आता परिस्थिती बदलू लागली असून भारतीय संघही पाकिस्तानी संघाचा आदर करू लागला आहे असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाला टार्गेट करत, नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या नावावरून शिंदे गटाला केले ट्रोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -