घरक्रीडाAsian Para Games 2018 : जलतरणपटू सुयश जाधवला सुवर्ण

Asian Para Games 2018 : जलतरणपटू सुयश जाधवला सुवर्ण

Subscribe

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचा जलतरणपटू सुयश जाधवने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

जलतरणपटू सुयश जाधवने भारतासाठी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक कमावले. सुयशने ही स्पर्धा ३२.७१ सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले. तर चीनच्या यांग होंगने ही स्पर्धा ३३.५४ सेकंदात पूर्ण करत रौप्य आणि थायलंडच्या बूनयारित स्पर्धा ३८.०९ सेकंदात पूर्ण करत कांस्यपदक पटकावले. आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशचे हे तिसरे पदक आहे. याआधी त्याने २०० मीटर वैयक्तिक मेडली आणि ५० मीटर फ्रीस्टाइल या दोन प्रकारांत कांस्यपदक मिळवले होते.

- Advertisement -

 

भालाफेकपटू संदीप चौधरीलाही सुवर्ण

भारताचा भालाफेकपटू संदीप चौधरीने ६०.०१ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. त्याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ६०.०१ मीटर लांब भाला फेकला. त्यामुळे त्याला सुवर्णपदक मिळाले. तर श्रीलंकेच्या चमिंडा समंथ हेट्टीने ५९.३२ मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक पटकावले. इराणच्या ओमिदी अलीने ५८.९७ लांब भालाफेक केल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -