Homeक्रीडाU19 T-20 WC : महिला विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; मुंबईकर खेळाडूकडे मोठी...

U19 T-20 WC : महिला विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; मुंबईकर खेळाडूकडे मोठी जबाबदारी

Subscribe

पुढील वर्षी 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने आज 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मुंबईकर खेळाडूकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पुढील वर्षी 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने आज 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मुंबईकर खेळाडूकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Indian team announced for U-19 Women T20 World Cup)

आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने निक्की प्रसाद हिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर मुंबईकर सानिका चाळके हीच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय संघात कमलिनी जी आणि भाविका अहिरे या दोन यष्टीरक्षकांचा समावेश केला आहे. तर नंदना एस, इरा जे आणि अनाडी टी या तीन खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jasprit Bumrah : गोलंदाजी करताना बुमराहच्या हाताच्या स्थितीचे विश्लेषण गरजेचे; ऑस्ट्रेलियाची मागणी

टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत हा गतविजेता असून त्यांचा यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसह अ गटात समावेश करण्यात आला आहे. भारत 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. यानंतर मलेशिया (21 जानेवारी) आणि श्रीलंकेविरुद्ध (23 जानेवारी) भारत सामना खेळेल. 19 ते 23 जानेवारी दरम्यान ग्रुप स्टेजचे सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ 25 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. सुपर सिक्समध्ये सहा संघांचे दोन गट असतील.

- Advertisement -

अंतिम सामना 2 फेब्रुवारीला 

दरम्यान, सुपर सिक्समधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 31 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. यानंतर अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ 2023 विश्वचषकात सहभागी होऊन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर मलेशियाला यजमान म्हणून स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. याशिवाय नेपाळ, नायजेरिया, समोआ, स्कॉटलंड आणि अमेरिका संघाने प्रादेशिक स्पर्धा जिंकून स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

भारतीय संघ : निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (यष्टीरक्षक), भाविका अहिरे (यष्टीरक्षक), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -