घर क्रीडा World Cup 2023 साठी भारतीय संघ जाहीर, पण होऊ शकतात 'हे' बदल

World Cup 2023 साठी भारतीय संघ जाहीर, पण होऊ शकतात ‘हे’ बदल

Subscribe

अजित आगरकर यांच्या निवड समितीकडून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केलेली आहे, त्यांच्या निवडीला कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून देखील समर्थन देण्यात आले आहे. परंतु, आता या संघात बदल होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (ICC Cricket World Cup 2023) भारतीय संघाची काल (ता. 5 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेत पत्रकार परिषद घेत भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनसह युवा फलंदाज टिलक वर्माला संघातून वगळण्यात आले आहे. अजित आगरकर यांच्या निवड समितीकडून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केलेली आहे, त्यांच्या निवडीला कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून देखील समर्थन देण्यात आले आहे. परंतु, आता या संघात बदल होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Indian team announced for World Cup 2023, but there may be ‘these’ changes)

हेही वाचा – India vs Bharat : भारताने ‘इंडिया’ नाव सोडल्यास पाकिस्तान करणार दावा? ‘या’ ट्वीटमुळे चर्चेला उधाण

- Advertisement -

काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित आगरकर यांच्या निवड समितीने ज्या खेळाडूंची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी निवड केली आहे. त्यामध्ये गोलंदाज रामचंद्र अश्विन आणि युझवेंद्र चहल यांना अपेक्षेप्रमाणे संघाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. पण येणाऱ्या काही दिवसांत यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ICC कडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार हा संघ जाहीर करण्यात आला.

परंतु, आता जर का या संघामध्ये काही बदल करायचे असतील, तर यासाठी 28 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संघात बदल करण्याची मुभा ही सहभागी संघाला आणि त्यांच्या बोर्डना असेल. पण महत्त्वाची बाब म्हणजे भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन वन-डे सामन्यांची मालिका 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास संघात बदल करण्याची संधी बीसीसीआयला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय 28 सप्टेंबरपर्यंत आपल्या वर्ल्ड कपच्या संघात बदल करू शकते.

- Advertisement -

परंतु, जर का संघामध्ये 28 तारखेनंतर बदल करायचे असतील तर त्यासाठी बीसीसीआयला आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. पण जर एखादा खेळाडू जायबंदी असेल किंवा त्याचे काही वैयक्तिक कारण असेल तर त्याला संघाबाहेर जाण्याची परवानगी आयसीसी लगेच देऊ शकतो. पण जर 28 सप्टेंबरपर्यंत जर बीसीसीआयने आपल्या संघात बदल केला तर त्यासाठी आयसीसीची परवानगी लागणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जे तीन वन-डे सामने खेळले जाणार आहेत. त्यात एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही तर त्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येण्याची शक्यता आहे.

विश्वचषक 2023 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

‘या’ खेळाडूंना विश्वचषकातून वगळले

रवीचंद्रन आश्विन, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि टिळक वर्मा या खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. टिलक वर्माचा फॉर्म बघता त्याला विश्वचषकात संधी मिळेल, असा अनेक माजी दिग्गजांना विश्वास होता. परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी टिळक वर्माचा अनुभव कमी पडेल यासठी निवड करण्यात आली नसेल. मात्र यंदा भारतात होणार एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण संघाने गेल्या 10 वर्षांपासून एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही आहे. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकणार का? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

- Advertisment -