मुंबईच्या रस्त्यावर रोहित शर्माचं गल्ली क्रिकेट, व्हिडिओ तुफान व्हायरल…

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी-२० संघाची मालिका सुरू आहे. यामध्ये जवळपास युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. तर सीनियर खेळाडू हे सध्या सुट्टीवर आहेत. परंतु भारतीय संघ पुढच्या काही दिवसात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघ एक कसोटी, तीन टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) मुंबईतील वरळीच्या रस्त्यावर गल्ली क्रिकेट खेळताना दिसला आहे. त्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जॉन्स या व्यक्तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित शर्माचा खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित वरळीतील स्थानिक मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा पहिल्या ग्रुपसह १६ जूनला इंग्लंडला रवाना होऊ शकतो. रोहित शर्माला सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार्टर्ड ऐवजी कमर्शिअल विमानाने लंडनला जाणार आहे. त्यामुळे मायदेशात सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.


हेही वाचा : आयपीएल लिलावातून बीसीसीआयला ४८ हजार कोटी, मीडिया राईट्सची विक्री पूर्ण