घरक्रीडाIND Vs SA: भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचं आव्हान

IND Vs SA: भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचं आव्हान

Subscribe

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचं आव्हान दिलं आहे. कागिसो राबाडा, लुंगी निगीडी आणि मार्को जॅनसेन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव १७४ धावांत आटोपला आहे. आफ्रिकेच्या या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. भारताचा पहिला डाव ३२७ धावांवर आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांवर संपला. त्यामुळे भारताला १३० धावांची आघाडी मिळाली. यामध्ये मयांक अग्रवाल ४ धावांवर बाद झाला. तर दुसऱ्या डावात भारताचा फलंदाज ऋषभ पंतने ३४ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

भारताने चौथ्या दिवशीही १ बाद १३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. शार्दूल ठाकूर १० धावांवर माघारी परतला. तर केएल राहुल २३ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र, कोहली १८ धावांवरच माघारी परतला आहे. विराटनंतर पुजाराने १६ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने २० धावा केल्या आहेत. तसेच भारताचा फिरकीपटू अश्विन १४ धावांवर बाद झाला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात फक्त ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी ४ तर लुंगी एगिडीने २ विकेट घेतल्या आहेत. भारताने ३०५ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेला दिलं असून आफ्रिका हे आव्हान पूर्ण करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारींना परत बोलवावे, नसीम खान यांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -