मुंबई: भारतीय पुरूष क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2023 या नवीन वर्षात संघ एकामागोमाग असे ICC च्या तीनही फॉरमॅटमधील सर्व सामने जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी मधील पहिला सामना देखील जिंकला. भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर पोहोचला आहे. (Indian team creates history:Team India number one in all three formats in ICC rankings mohmmad Shami Indian Sunil Gavaskar ICC Indian team )
आयसीसीने नुकत्याच सुधारित केलेल्या टीम रँकिंगनुसार टी-20 फॉरमॅटमध्ये भारत 18 हजार 445 पॉइंट आणि 267 रेटिंग सह पहल्या स्थानावर आहे. तर वनडे रँकिंगमध्ये 5 हजार 10 पॉइंट आणि 114 रेटिंग सह पहिल्या स्थानी आहे. तसंच टेस्ट रॅंकिंगमध्येही भारतानं वर्चस्व राखलं असून यात भारत 3 हजार 690 पॉइंटसह 115 स्थानी आहे.
एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा भारत हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. तर जगातील दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघानेही अशी कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 276 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने 49व्या षटकात 5 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
भारताकडून मोहम्मद शमीने गोलंदाजीत 5 बळी घेतले, तर दुसरीकडे सूर्याने फलंदाजीत 50 धावांची खेळी केली, तर केएल राहुल 58 धावा करून नाबाद राहिला. शमीला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. आता भारतीय संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियावर 1-0 ने आघाडीवर आहे.
(हेही वाचा: भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय; डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी वाया )
ICYMI
10 Overs
1 Maiden
51 Runs
5 Wickets
𝘿𝙊 𝙉𝙊𝙏 𝙈𝙄𝙎𝙎: Watch how @MdShami11 registered his best-ever ODI figures with THAT fifer 👇👇📹https://t.co/uY04T3xDzO #INDvAUS pic.twitter.com/aCfkXbChS3
— BCCI (@BCCI) September 22, 2023
🇮🇳 Numero Uno in Test, ODI, and T20I cricket.
Heartiest congratulations to #TeamIndia for achieving this historic milestone. The rankings reflect the hard work put in by this team as they chase excellence on the field. This is fantastic achievement just ahead of the World Cup.… pic.twitter.com/wR4JDlqBJy
— Jay Shah (@JayShah) September 22, 2023