Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IND vs SL : धवन कर्णधारपदी; महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड

IND vs SL : धवन कर्णधारपदी; महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड

शिखर धवनची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून भुवनेश्वर कुमार उपकर्णधारपद भूषवले.

Related Story

- Advertisement -

भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून भुवनेश्वर कुमार उपकर्णधारपद भूषवले. तसेच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि कर्नाटकाचा देवदत्त पडिक्कल या सलामीवीरांना पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉचाही या संघात समावेश आहे.

चेतन साकारियाला संधी

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार असून एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहे. या मालिकांसाठी फिरकीपटू म्हणून युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यांची निवड झाली आहे. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी करणाऱ्या चेतन साकारियालाही संधी देण्यात आली आहे. साकारिया डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. साकारिया आणि भुवनेश्वर यांच्यासह दीपक चहर आणि नवदीप सैनी हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

- Advertisement -

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

- Advertisement -