घरक्रीडामिचेल स्टार्कच्या वादळापुढे भारतीय संघाचे लोटांगण, एकदिवसीय मालिका बरोबरीत

मिचेल स्टार्कच्या वादळापुढे भारतीय संघाचे लोटांगण, एकदिवसीय मालिका बरोबरीत

Subscribe

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला चारमुंड्या चीत केल्याचे पाहायला मिळाले. मिचेल स्टार्कच्या वादळानंतर ऑस्ट्रेलियाने ११ षटकात सामना जिंकला.

स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढच्या दोन सामन्यासाठी पॅट कमिंन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथकडे कर्णधाराची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर स्मिथने तिसरा कसोटी सामना जिंकला आणि चौथा कसोटी सामना जिंकत अनिर्णित ठरवत भारताचे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सर्व जिंकण्याचे स्वप्न धुळीत मिसळले होते. त्यानंतर आता एकदिवसीय सामन्याततील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने उत्तम नेतृत्वाचे प्रदर्शन करताना भारताला आधी २६ षटकात सर्व बाद ११७ धावांवर रोखले आणि दुसरा सामना ११ षटकात जिंकला.

- Advertisement -

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. फॉर्मात असलेल्या मिचेल स्टार्कने गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला. त्याने सलग षटके फेकताना चार विकेट घेतल्या. त्यानंतर सीन एबॉट व नॅथन एलिस यांनी उरलेल्या विकेट घेतल्यामुळे भारताचा डाव ११७ धावांवर संपुष्टात आला.

भारताचा डाव
मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात शुबमन गिलला (०) पॉईंडवर उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने झेल घेतल्यामुळे रोहित शर्माला (१३) धावांवर बाद झाला आणि पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव (०) पायचीत झाला. मागील सामन्यातील फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलला (९) स्टार्कने पायचीत केले. लोकेशने डीआरएस घेऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याला (१) सीन एबॉटने माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथने हवेत झेप घेताना एका हाताने अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे भारताचा अर्धा संघ ४९ धावांवर माघारी परतला होता.

- Advertisement -

विराट आणि रविंद्र जडेजाने ३६ चेंडूंत २२ धावांची भागीदारी केली, परंतु नॅथन एलिसने विराटला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. विराट ३५ चेंडूंत ३१ धावांवर पायचीत बाद झाला. एलिसने त्याच्या पुढच्या षटकात जडेजालाही (१६) धावांवर बाद करत भारताला सातवा धक्का दिला. जडेजाने चुकीचा फटका मारला अन् यष्टिरक्षक अॅलेक्स केरीने स्वत: झेल घेत जडेजाला बाद केले. कुलदीप यादव (४) एबॉटच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगला ट्रॅव्हीड हेडच्या हाती झेल देऊन माघारी परतल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीही बाद झाला. अक्षर पटेलने आक्रमक पवित्रा स्वीकारताना स्टार्कला सलग दोन षटकार खेचले. मात्र त्यानंतर स्टार्कने मोहम्मद सिराजला बाद करत अखेरची विकेट घेतली आणि भारताला २६ षटकांत ११७ धावांवर सर्वबाद केले.

ऑस्ट्रेलियाचा डाव
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मिचेल मार्श व ट्रेविस हेड यांनी नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मिचेल मार्शने ३० चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५१ धावा, तर मिचेल मार्शने ३६ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -