घरक्रीडाटीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा पक्का! मर्यादित षटकांचे सामने सिडनी, कॅनबेरात 

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा पक्का! मर्यादित षटकांचे सामने सिडनी, कॅनबेरात 

Subscribe

एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने २७ आणि २९ नोव्हेंबरला सिडनी येथे होऊ शकतील.   

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत मागील काही काळात बरीच चर्चा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, न्यू साऊथ वेल्स सरकारने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर क्वारंटाईनमध्ये असताना सराव करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच एका क्रिकेट वेबसाईटच्या माहितीनुसार, या दौऱ्यातील मर्यादित षटकांचे सामने सिडनी आणि कॅनबेरा येथे होणार आहेत.

लवकरच वेळापत्रक होणार जाहीर 

भारतीय संघ याआधी ऑस्ट्रेलियात ब्रिस्बन येथे दाखल होणार होता. मात्र, क्विन्सलँड राज्य आरोग्य विभागाने १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये भारतीय संघाला सराव करण्यास परवानगी नाकारली होती. परंतु, आता न्यू साऊथ वेल्स सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनी येथे क्वारंटाईन होऊन सराव करणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने २७ आणि २९ नोव्हेंबरला सिडनी येथे होण्याची शक्यता आहे, तर अखेरचा एकदिवसीय सामना कॅनबेरा येथे होऊ शकेल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच बीसीसीआयशी चर्चा करून या दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -