घरक्रीडाभारताचे कसोटीपटू खेळणार कौंटीमध्ये ?

भारताचे कसोटीपटू खेळणार कौंटीमध्ये ?

Subscribe

भारतीय कसोटी संघाचे काही खेळाडू, ज्यांची ३० मे पासून सुरु होणार्‍या विश्वचषकासाठी निवड झाली नाही, ते कौंटी क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळण्याच्या तयारीत आहेत. विश्वचषकानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी पुरेसा सराव मिळावा याकरता चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा या ७ खेळाडूंना कौंटी क्रिकेट पाठवण्याची तयारी बीसीसीआयने दर्शवली आहे.

पुजारा मागील काही वर्षे सातत्याने कौंटी क्रिकेट खेळत आहे. त्याने याआधीच यॉर्कशायर संघाशी तीन वर्षांचा करार केलेला आहे. त्यामुळे तो यंदाही त्यांच्याकडून खेळेल. तसेच कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हॅम्पशायर संघाशी करार करण्याची शक्यता आहे. कौंटीमध्ये खेळण्यासाठी रहाणेने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे परवानगी मागितली आहे. प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आधीच परवानगी दिली आहे. मात्र, डायना एडुल्जी आणि लेफ्टिनेंट जनरल रवी थोडगे या प्रशासकीय समितीच्या इतर दोन सदस्यांनी त्याला अजून परवानगी दिलेली नाही, पण हे दोघेही लवकरच परवानगी देतील, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

इतर खेळाडूंसाठी बीसीसीआय लेस्टरशायर, इसेक्स आणि नॉटिंगहॅमशायर या कौंटी संघांच्या संपर्कात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी बीसीसीआयला या खेळाडूंना किमान ३-४ कौंटी सामने खेळण्याची संधी द्यायची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -