Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचे गोलंदाजांना खास मार्गदर्शन

IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचे गोलंदाजांना खास मार्गदर्शन

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय चाहते आता दुसऱ्या सामन्यात पराभवाचा वट्टा काढणार का याची आशा लावून आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय चाहते आता दुसऱ्या सामन्यात पराभवाचा वट्टा काढणार का याची आशा लावून आहेत. अशातच कर्णधार रोहित शर्मा याने मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना गमवला. शिवाय याआधी बरेचशे सामने भारताला गोलंदाजीमुळेच गमवावे लागले असल्याचे रोहित शर्माचे म्हणणे आहे. त्यामुळे दुसऱ्यासामन्यापूर्वी भारतीय संघाताली गोलंदाजांना खास मार्गदर्शन करण्यात आले. (Indian vs Australia Rohit Sharma Team India Anxiety Second t20 Match t20)

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना शुक्रवारी नागपूरमध्ये होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने गुरूवारी संध्याकाळी भारतीय संघाची एक आपातकालीन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली मते व्यक्त केली. या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचचा गोलंदाजीवर विशेष लक्ष देण्यात आले. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारताला गोलंदाजीमुळेच सामने गमवावे लागले असल्याचे या बैठकीमध्ये बोलल्याचे समजते.

- Advertisement -

याशिवाय, आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना हे त्याचे उत्तम उदाहरण असून, यापुढे भारताची गोलंदाजी कशी असायला हवी, त्यामध्ये नेमके कोणते बदल व्हायला हवेत आणि कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे. याबाबत रोहित आणि द्रविड यांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी भारतीय संघातील जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युजवेंद्र चहल यांना यावेळी खास मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर पुढील सामन्याच्या विजयासाठी रणनिती नेमकी कशी असावी, याबाबतही चर्चा केल्याचे समजते.

भारताने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीत नेमक्या कोणत्या चुका केल्या आणि त्याचा कसा फटका बसला, हे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता भारताच्या गोलंदाजीमध्ये लक्षणीय बदल आपल्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाहायला मिळू शकतो. कारण आता टी-२० विश्वचषकासाठी फार कमी दिवस राहीले असून, आता प्रयोग करून चालणार नाही. त्यामुळे आता विश्वचषकाची रणनिती या दुसऱ्या सामन्यापासून अंमलात आणायची तयारी सुरु झाल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व सलामीवीर अॅरॉन फिंचने सामन्याच्या सुरूवातीलाच फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संघाला 209 धावांचे आव्हान पार करणे सहज शक्य झाले.


हेही वाचा – IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी तिकीटविक्री केंद्रावर चेंगराचेंगरी; 4 जण जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -