घरक्रीडामाझी शस्त्रक्रिया यशस्वी.., अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया

माझी शस्त्रक्रिया यशस्वी.., अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने कार अपघातातून सावरल्यानंतर पहिल्या प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी मी सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे, असं या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

- Advertisement -

३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभ पंतच्या गाडीला अपघात झाला होता. ज्यामध्ये त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, आता १५ ते १६ दिवसानंतर पंतने पहिली प्रतिक्रिया इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. माझी तब्येत दिवसागणिक सुधरत आहे. मी पुढील आव्हांनासाठी देखील तयार आहे. यावेळी मी बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार मानतो, असं देखील ऋषभ पंतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी ऋषभ पंत परतत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास रुरकीच्या नारसन सीमेवरील हम्मदपूरजवळ कारचा भीषण अपघात झाला. पंतची मर्सिडीज गाडी (DL 10 CN 1717) सुसाट वेगात होती आणि दुभाजकाला आदळल्यानंतर रेलिंग तोडून गाडी पलीकडे गेली. वेग जास्त असल्याने सुमारे २०० मीटरवर जाऊन ही कार थांबली. त्यानंतर तिला आग लागली. ऋषभ पंत ज्या कारमधून घरी परतत होता, त्या गाडीचा नंबर प्लेट आहे.

काही प्रवाशांनी गाडीची पुढची काच फोडून गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पाठीलाही मार बसला होता, मात्र, त्याची प्रकृती स्थिर आहे. बीसीसीआय पंतच्या सतत संपर्कात असून त्यावर लक्ष ठेवून आहे.

पंतची गुडघ्यावरील शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्याच्या तब्येतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. परंतु पंत किमान ६ ते ७ महिने मैदानापासून दूर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा आणि इतर स्पर्धांमध्ये त्याला सहभाग घेता येणार नाहीये, असं देखील म्हटलं जात आहे.


हेही वाचा : ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; आठ ते नऊ महिने खेळ नाही


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -