घरक्रीडाCovid-19 : आणखी एका भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन

Covid-19 : आणखी एका भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन

Subscribe

पुनियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आईबाबत भावनिक पोस्ट लिहिली.

भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीच्या आईचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. आता भारताच्या आणखी एका महिला क्रिकेटपटूच्या आईची कोरोनाची झुंज अपयशी ठरली. भारताची फलंदाज प्रिया पुनियाच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. पुनियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आईबाबत भावनिक पोस्ट लिहिली. ‘तू नेहमी मला खंबीर राहा असे का म्हणायचीस हे आज मला समजले. एके दिवशी मला तुझ्याविना जगावे लागणार आहे, याची तुला कल्पना होती. आई मला तुझी खूप आठवण येत आहे. मी कितीही लांब गेले, तरी तू माझ्यासोबत आहेस याची मला खात्री असायची. आयुष्यात काही सत्य स्वीकारणे फार अवघड असते. तुझ्या आठवणी मी कधीही विसरू शकणार नाही,’ असे पुनियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Punia (@priyapunia16)

- Advertisement -

नियम पाळा आणि काळजी घ्या

भारतामध्ये कोरोनाचा धोका अजूनही कायम असून अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे सर्वांना कोरोनाला रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन पुनियाने केले. ‘कृपया नियम पाळा आणि काळजी घ्या. मास्क लावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, सुरक्षित राहा,’ असे पुनिया म्हणाली. पुनियाने आतापर्यंत भारतासाठी ७ एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत.

वेदाच्या आई आणि बहिणीचे निधन 

कोरोनामुळे अनेकांनी आपले जीव गमावले असून भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या जवळच्या व्यक्तींचेही निधन झाले आहे. वेदा कृष्णमूर्तीच्या आई आणि बहिणीचे कोरोनामुळे निधन झाले. तर पियुष चावला आणि आरपी सिंह यांच्या वडिलांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -