इतिहासात प्रथमच भारताने लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक पटकावले

इतिहासात प्रथमच भारताने लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने आणखी एका सुवर्णपदक पटकावले आहे.

इतिहासात प्रथमच भारताने लॉन बाऊल्समध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने आणखी एका सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय महिलांच्या ग्रुपने लॉन बॉल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 17-10 च्या फरकाने पराभूत केले. (Indian Women Fours team in Lawn Bowls wins historic gold medal beating South Africa 17 10 in final)

भारताने याआधी उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी दमदार खेळी केली. सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघानी चुरशीची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने काही काळ आघाडी घेतली होती. पण 10 गुण आफ्रिकेचे असताना भारतानेही बरोबरी केली.

10-10 अशी बरोबरी झाल्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ दाखवत 17 गुणांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकही गुण मिळवता आला नाही आणि भारताने 17-10 च्या फरकाने सामना जिंकला. याआधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला 16-13 च्या फरकाने मात दिल्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झाले होते.

लॉन बॉल्स स्पर्धेत यंदा सुरुवातीपासूनच भारतीय महिलांचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या संघातील रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी कमाल कामगिरी करत भारताला गोल्ड मिळवून दिलं आहे.

सुवर्णपदकाचे श्रेय मधुकांत पाठकांना

भारताने जे राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक पदक पटकावले, त्याचे श्रेय मधुकांत पाठक यांना जाते. या संघात जे खेळाडू आहेत, त्यांना पाठक यांनीच प्रशिक्षण दिले होते. पाठ हे एक क्रिकेट पंच होते. बऱ्याच क्रिकेटच्या सामन्यांमध्ये त्यांनी पंचगिरी केली. एकदा ते ऑस्ट्रेलियाला गेले होते आणि त्यांनी तेव्हा हा खेळ पहिल्यांदा पाहायला मिळाला. पण जेव्हा हा खेळ शिकून पाठक भारतात आले तेव्हा मात्र त्यांना वाईट प्रतिक्रीया मिळाल्या होत्या. भारतात कोणीच लॉन बॉल खेळाला गंभीरपणे घेत नव्हते. मात्र तरीही मधुकांत पाठक यांनी जिद्द कायम ठेवली. रांचीमध्ये त्यांनी संघ बांधणीला सुरुवात केली. या खेळासाठी कोणतीच मर्यादा नाही, वयाचीही नाही. कोणत्याही वयातील आणि कोणतेही व्यंग असलेली व्यक्ती हा खेळ खेळू शकते. कारण हा खेळ बुद्धिचा आहे.


हेही वाचा – आशिया चषक 2022 चे वेळापत्रक जाहीर; अफगाणिस्तान आणि श्रीलंकेत होणार पहिला सामना