घरक्रीडाU19T20WorldCup : गळ्यात विजयी मेडल अन् 'काला चष्मा'वर भारतीय महिला खेळाडूंचा भन्नाट...

U19T20WorldCup : गळ्यात विजयी मेडल अन् ‘काला चष्मा’वर भारतीय महिला खेळाडूंचा भन्नाट डान्स; पाहा व्हिडीओ

Subscribe

भारतीय संघाने महिला अंडर-१९ विश्वचषकचा पहिला आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाने स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. पॉचेफस्ट्रुम येथील सेनवेस पार्कमध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला.

भारतीय संघाने महिला अंडर-१९ विश्वचषकचा पहिला आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाने स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. पॉचेफस्ट्रुम येथील सेनवेस पार्कमध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. या दणदणीत विजयांनंतर भारतीय संघाच्या महिला खेळाडूंनी प्रसिद्ध काला चष्मा या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. सध्या त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक चाहत्यांनी त्याला पसंती दिली आहे. (Indian women players danced on Kaala Chashma song after win the World Cup)

१९ वर्षांखालील मुलींचा पहिला वहिला टी-२० विश्वचषक भारतीय संघाने रविवारी जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अप्रतिम खेळी करत इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळला. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले आणि संघाला ५ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर रविवारी शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. या सामन्यात तितास संधू, अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मुलींच्या संघाची वाईट अवस्था केली. इंग्लंडचा संघ ६८ धावांत तंबूत परतला. संधूने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हीपला (०) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्चना देवीने इंग्लंडच्या निआम्ह हॉलंडचा (१०) त्रिफळा उडवला.

कर्णधार ग्रेस स्क्रीव्हन्सला (४) देवीने बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. संधूने सामन्यातील दुसरी विकेट घेताना सेरेन स्मेलची विकेट घेतली. त्यानंतर चोप्राने दोन धक्के दिले. गोंधळलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी विकेट फेकल्या. जॉसी ग्रोव्हेस (४) रन आऊट झाली. शेफालीने इंग्लंडला आठवा धक्का देताना हॅना बेकरला (०) माघारी पाठवले. मन्नत कश्यपने नववा धक्का देताना अॅलेक्सा स्टोनहाऊसची (११) विकेट घेतली. सोनम यादवने शेवटची विकेट घेतली.

- Advertisement -

हेही वाचा –नोव्हाक जोकोविच ठरला ऑस्ट्रेलियन ओपनचा बादशाह, दहाव्यांदा पटकावले जेतेपद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -