घरक्रीडाआशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Subscribe

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेला १५१ चं आव्हान दिलं होतं. परंतु त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये भारताने श्रीलंकेचे दोन गडी बाद केले. त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकामागून एक विकेट्स घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे श्रीलंकेला मोठा धक्का बसला.

श्रीलंकेचा डाव यावेळी १०९ धावांवर आटोपला आणि भारताला ४१ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला. दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार आणि हेमलता यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

- Advertisement -

भारताची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रीग्सने सामन्यात चांगली कामगिरी केली. जेमिमा रॉड्रीग्सने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७६ धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्यामुळे भारतीय संघाला २० षटकांमध्ये ६ बाद १५० अशी मजल मारता आली.

आशिया चषकात भारतीय संघाला श्रीलंकेच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले होते. परंतु महिला संघाने या पराभवाचा बदला घेत दणदणीत विजय मिळवला.

- Advertisement -

हेही वाचा : आयसीसीच्या नियमांत मोठे बदल; आजपासून होणार लागू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -