T20 world cup 2021 : NZ vs PAK न्यूझीलंड विरूध्दच्या सामन्यात भारतीय फॅन्सचे पाकला समर्थन ; ग्रुप २ मध्ये मोठा पेच

न्यूझीलंड विरूध्द पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय भारतासाठी फायद्याचा ठरू शकतो

टी २० विश्वचषकात भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही, पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात १० बळी राखून भारताचा पराभव केला आणि विश्वचषकातील एक मोठा विक्रम मोडीत काढला. असे पहिल्यादांच झाले की पाकिस्तानने भारताचा विश्वचषकात पराभव केला. पण त्याच पराभवाने भारताच्या अडचणीत वाढ झाली असून उपांत्य फेरीपर्यंत पोहचण्याचा मार्ग देखील खडतर झाला आहे. मंगळवारी होणाऱ्या पाकिस्तान विरूध्द न्यूझीलंडच्या सामन्यावर खूप काही अवलंबून आहे. कारण या सामन्यात जर पाकिस्तानचा विजय झाला तर गुणतालिकेत भारताला फायदा होऊ शकतो.

भारतीय संघ टी २० विश्वचषकात ग्रुप २ चा हिस्सा आहे, या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नामिबिया या संघाचा समावेश आहे. प्रत्येक संघाचा एकमेकांसोबत सामना होणार आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे आणि सोमवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलँडचा मोठ्या फरकाने पराभव केला. अशातच भारताला उपांत्य फेरीचा प्रवास सुखकर करायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक सामन्यात विजयासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

भारतीय संघाचा इतिहास बघता अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबिया या संघाचा पराभव करणे भारतीय संघासाठी कठीण नसेल. पण टी २० विश्वचषकात कधीही कोणतेही फेरबदल होऊ शकतात, जे ३ संघ चांगली खेळी करतील ते सुपर १२ च्या राउंड पर्यंत पोहचणार आहोत. त्यातच न्यूझीलंडचा संघ भारतासाठी मोठे आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ विश्वचषकात २ वेळा आमनेसामने आले आहेत. पण दोन्ही सामन्यांत भारताचा पराभव झाला असून न्यूझीलंड विरूध्दचा सामना भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे.

भारताचे आगामी सामने

३१ ऑक्टोबर – न्यूझीलंड
३ नोव्हेंबर – अफगाणिस्तान
५ नोव्हेंबर – स्कॉटलँड
८ नोव्हेंबर – नामिबिया

पाकिस्तानच्या विजयाने होणार भारताला फायदा

टी २० विश्वचषकात मंगळवारी पाकिस्तान विरूध्द न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला तर भारताला फायदा होऊ शकतो कारण जर भारताने न्यूझीलंडचा पराभव केला तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग सोपा होईल. पण न्यूझीलंडने हा सामना जिंकला आणि भारताने पण पुढील सामना जिंकला तर अडचण ही होईल की, न्यूझीलंडचा अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबिया कडून पराभव झाला तरच भारत उपांत्य फेरीच्या स्पर्धेत असणार आहे. त्यामुळे भारतासाठी सोपा मार्ग म्हणजे पाकिस्तानने न्यूझीलंड विरूध्दच्या सामन्यात विजय मिळवणे.