घरक्रीडाबर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सहावे पदक, वेटलिफ्टींगमध्ये अचिंता शेउलीनेला सुवर्ण

बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सहावे पदक, वेटलिफ्टींगमध्ये अचिंता शेउलीनेला सुवर्ण

Subscribe

बर्मिंघम येथे सुरु असणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये सहावे पदक मिळाले आहे. एकून ३१३ किलो वजन उचलत अचिंता शेउलीने सुवर्णपदकावर नाव कोरले. अचिंताने स्नॅच प्रकारात १३७ किलो तर लिफ्टमध्ये १३९ किलो वजन उचलले. तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन त्यांने उचलले. अचितांने ही कामगिरी 73 किलो वजन गटात केली आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये विक्रम –

- Advertisement -

क्लिन अँड जर्कमध्ये चुरशीची स्पर्धा बघायला मिळाली. अचिंतासमोर मलेशियाच्या मोहम्मदचे आव्हान होते. पहिल्या प्रयत्नात क्लीन अँड जर्कमध्ये अंचिताला १७० किलो वजन उचलण्यात अपयश आले. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांने 170 किलो वजन उचलले. त्याआधी स्नॅच राऊंडमध्ये दुसऱ्या स्थानी मलेशियाचा हिदायत मोहम्मद होता. त्याने 136 किलो वजन उचलले होते. तर अचिताने स्नॅच राऊंडमध्ये दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्समध्ये विक्रम रचला. स्नॅच राऊंडमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुणीही 140 किलो वजन उचलले नव्हते.

भारत सहाव्या स्थानावर –

- Advertisement -

कॉमनवेल्थ गेम्सच्या पदक तालिकेत भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या पुढे आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिन आफ्रिका आणि कॅनडा हे देश आहेत. आतापर्यंत भारताकडून अंचिता शेउली आणि जेरेमी लालरिनुंगा यांच्या आधी मीराबाई चानूने सुवर्णपदक, संकेत सरगरने रौप्य तर बिंदियाराणी देवीने रौप्य आणि गुरुराज पुजारी ने कांस्य पदक पटकावले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -