घरक्रीडामहिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक, अन्नू राणीची उत्कृष्ट कामगिरी

महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक, अन्नू राणीची उत्कृष्ट कामगिरी

Subscribe

भारतीय महिला खेळाडू आणि भालाफेकपटू अन्नू राणीने उत्कृष्ट कामगिरी करत देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. अन्नू राणीने 60 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. राणीच्या आधी राष्ट्रकुल चॅम्पियन काशिनाथ नायक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांनी पुरुषांच्या भालाफेकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या केल्सी ली बार्बरनं 64.43 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.

- Advertisement -

अन्नू राणीने या खेळांमध्ये महिलांच्या भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. केल्सी ली बार्बरने सुवर्णपदक जिंकले, तर मॅकेन्झी लिटलने रौप्यपदक जिंकले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अन्नूने चौथ्या प्रयत्नात 60 मीटर भालाफेक केली. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे

- Advertisement -

भारताकडे आता या खेळांमध्ये 16 सुवर्णांसह एकूण 47 पदके आहेत. त्याने 12 रौप्य आणि 19 कांस्यपदकेही जिंकली आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अन्नूने 60 मीटर अंतरावर भालाफेक करताना तिसरा क्रमांक पटकावला.

दरम्यान, बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी एक यश मिळाले आहे. देशाची महिला बॉक्सर आणि जगज्जेती निकहत जरीनने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. निकहतने 51 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.


हेही वाचा : 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारला कांस्यपदक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -