Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा भारतातील आतापर्यंतचं बायोबबल वातावरण सर्वाधिक असुरक्षित - झॅम्पा

भारतातील आतापर्यंतचं बायोबबल वातावरण सर्वाधिक असुरक्षित – झॅम्पा

Related Story

- Advertisement -

आयपीएल सोडून मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाने भारतातील बायोबबल वातावरणाबाबत मोठं विधान केलं आहे. भारतातील बायोबलचं वातावरण आता पर्यंतचं असुरक्षित आहे, त्यामुळे मी आयपीएल २०२१ (IPL 2021) मधून माघार घेतली, असं झॅम्पाने म्हटलं आहे. मागील वर्षीप्रमाणेच या वेळचं आयपीएल युएईमध्येही व्हायला हवं होतं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघातील झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारण देत मायदेशी परतले आहेत.

अ‍ॅडम झॅम्पाने सिडनी मॉर्निंग हेराल्डला मुलाखत दिली. गेल्या वर्षी आयीपएल यूएईमध्ये खेळवण्यात आलं होतं. तिथे आम्हाला सुरक्षित वाटत होतं. “आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायोबबल वातावरणात खेळलो आणि मला वाटतं की भारतातील बायोबबलचं वातावरण हे सुरक्षित नाही आहे. आम्हाला भारतात नेहमीच स्वच्छतेबद्दल सांगितलं जात होतं आणि अधिकची दक्षता घ्यावी लागत होती, असं झॅम्पाने म्हटलं.

- Advertisement -

‘सहा महिन्यांपूर्वी आयपीएल दुबईमध्ये झाली होती, त्यामुळे तेथे आम्हाला अजिबात तसं वाटत नव्हतं. मला तिथे खूप सुरक्षित वाटलं. वैयक्तिकरित्या मला वाटतंय की आयपीएलसाठी यूएई हा एक चांगला पर्याय ठरला असता, परंतु त्यात बरीच राजकारणाची जोड आहे. यावर्षी टी-२० वर्ल्ड कप आहे. कदाचित क्रिकेट विश्वात पुढील चर्चा यावर असेल, असं झॅम्पा म्हणाला.

 

- Advertisement -