IND vs SL : विराटची शतकी खेळी, भारताचं श्रीलंकेसमोर 391 धावांचं आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा वनडे सामना खेळवला जात आहे. हा सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. यावेळी रनमशीन विराट कोहली आणि शुभमन गील यांनी शतक झळकावत श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. भारतानं श्रीलंकेला 391 धावांचं आव्हान दिलं आहे. विराट कोहलीने नाबाद 166 तर शुभमनने 116 धावा केल्या आहेत.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 390 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गील यांनी उत्कृष्ट खेळी करण्यास सुरूवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

रोहित शर्मा 46 धावा करुन बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला आणि त्याने गीलसोबत फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. विराटने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तुफान फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. 85 चेंडूत त्याने शतक पूर्ण करत 74 वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. तर अय्यरनेही 38 धावा केल्या.

विराट कोहलीचं हे 46 वं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक आहे. सचिनने 49 शतकं केली होती. त्यामुळे विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वन-डे शतकांच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. दरम्यान, भारतानं श्रीलंकेसमोर 391 धावांचं आव्हान दिलं असून श्रीलंका हे आव्हान  पूर्ण करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे निवृत्तीचे संकेत; म्हणाला, ‘हे वर्ष…’