घर क्रीडा भारताचा कूल कॅप्टन धोनी करतोय 'हे' काम; इंस्टाग्रामवरून दिली माहिती

भारताचा कूल कॅप्टन धोनी करतोय ‘हे’ काम; इंस्टाग्रामवरून दिली माहिती

Subscribe

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी, त्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींची माहिती त्याचे चाहते हे शोधून काढतातच. पण यावेळी मात्र धोनीने स्वतः तो सध्या काय करतोय याबाबतची माहिती त्याच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.

महेंद्रसिंग धोनी ज्याला भारतीय क्रिकेटचा संघाचा कॅप्टन कूल म्हटले जाते, तो अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे, जो सोशल मीडियावर फारसे सक्रिय दिसत नाही. धोनीची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि ती नेहमीच वेगवेगळे अपडेट्स तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवरून देत असते. मात्र धोनी स्वत: त्यात फारसा रस घेताना दिसत नाही. त्यामुळे धोनीने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच त्याच्या अधिकृत खात्यावर एक पोस्ट अपलोड केली आहे. धोनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जो काही तासात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीचे अनोखे रूपही पाहायला मिळत आहे, जे कोणीही याआधी पाहिले नसेल.

बुधवारी संध्याकाळी 7 वाजता धोनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट mahi7781 वर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या फार्म हाऊसमध्ये ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनी एखाद्या कुशल ट्रॅक्टर चालकाप्रमाणे पिकाची पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरने शेत नांगरताना दिसून येत आहे. निळा लोअर परिधान केलेल्या धोनीने टी-शर्टऐवजी फक्त स्लीव्हलेस व्हेस्ट परिधान केले आहे. या व्हिडिओमध्ये तो ट्रॅक्टर पुढे नेतो, नंतर मागे घेतो जेणेकरून शेताचा उरलेला भागही ट्रॅक्टरला जोडलेल्या फावड्याच्या सहाय्याने खोदता येईल. यादरम्यान त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती ट्रॅक्टरवर बसलेली दिसत आहे. धोनीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “काहीतरी नवीन शिकून चॅन वाटले, परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

- Advertisement -

अवघ्या 4 तासात व्हायरल झाला व्हिडीओ
धोनीचा हा व्हिडिओ अवघ्या 4 तासात प्रचंड व्हायरल झाला आहे. 4 तासांत सुमारे 1.6 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 27 लाख लोकांनी याला लाईक केले आहे आणि 60 हजार लोकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. धोनीची आयपीएल टीम चेन्नई सुपर किग्सच्या अधिकृत फॅन इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील कमेंट करण्यात आली आहे. यामध्ये लिहिण्यात आले आहे की, “खूप दिवसांनी दर्शन… दिन बन गया.” त्याचप्रमाणे इतर नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात

8 जानेवारी 2021 रोजी केली होती शेवटची पोस्ट
धोनीने 8 जानेवारी 2021 रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट अपलोड केली होती. त्यानंतरही धोनीने त्याच्या दुसऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर शेताचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो त्याच्या शेतात पिकलेल्या स्ट्रॉबेरीची चव चाखताना दिसत होता. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये धोनीने लिहिले की, “जर मी असंच शेतात येत राहिलो तर बाजारात पाठवायला स्ट्रॉबेरी उरणार नाही.” यानंतर, धोनी गेली दोन वर्षे फक्त साक्षी धोनीच्या इन्स्टा अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर दिसला, पण त्याच्या अकाऊंटवरून कोणतीही पोस्ट टाकली गेली नाही.

- Advertisment -