घरक्रीडाभारताची वेगवान गोलंदाजांची फळी जगात सर्वोत्तम - शमी

भारताची वेगवान गोलंदाजांची फळी जगात सर्वोत्तम – शमी

Subscribe

भारताची सध्याची वेगवान गोलंदाजांची फळी जगात सर्वोत्तम आहे, असे मत मोहम्मद शमीने व्यक्त केले. शमीसह जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मागील काही वर्षांत फारच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले. भारताच्या या यशात वेगवान गोलंदाजांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच शमीने त्याचा समावेश असलेल्या गोलंदाजांच्या फळीचे कौतुक केले.

आमची वेगवान गोलंदाजांची फळी जगात सर्वोत्तम आहे. केवळ तूच नाही, तर सगळेच माझ्याशी सहमत असतील. क्रिकेट इतिहासात कोणत्याही संघाकडे एकाच वेळी इतके चांगले पाच वेगवान गोलंदाज होते असे मला वाटत नाही. त्यामुळे बहुतेक आम्ही जगात सर्वोत्तम आहोत, असे शमी म्हणाला. तो भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताशी संवाद साधत होता.

- Advertisement -

खासकरून शमी, बुमराह आणि ईशांत या त्रिकुटाने मिळून खूप यश संपादले आहे. परंतु, तुमच्यात सर्वात आधी गोलंदाजी कोण करणार हे कसे ठरते असे विचारले असता शमीने सांगितले की, आम्ही कर्णधार कोहलीकडे जातो आणि त्याला निर्णय घेण्यास सांगतो. मात्र,‘तुम्हीच हा निर्णय घ्या,’ असे तो सहसा आम्हाला सांगतो. त्यामुळे आमच्या संघाच्या बैठकीत फार मजा येते. मी इतर दोघांना (बुमराह व ईशांत) नव्या चेंडूने गोलंदाजी करू देतो. थोड्या जुन्या चेंडूने गोलंदाजी करायला माझी हरकत नसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -