घरक्रीडाभारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन  

भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन  

Subscribe

बॉम्बे आणि एमसीसी या संघांत १९७७ मध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात त्यांनी प्रथमच समालोचन केले होते. 

भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक आणि भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू यांची कन्या चंद्रा नायडू यांचे रविवारी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. इंदूरच्या होळकर स्टेडियमपासून जवळच असणाऱ्या मनोरामगंज येथील त्यांच्या घरी चंद्रा नायडू यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्रा या बराच काळ आजारी होत्या आणि आजारपणामुळे त्यांना चालणेही अशक्य झाले होते. चंद्रा या भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक होत्या. राष्ट्रीय विजेते बॉम्बे आणि एमसीसी या संघांत इंदूर येथे १९७७ मध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात त्यांनी प्रथमच समालोचन केले होते.

चंद्रा नायडू यांनी त्यांच्या वडिलांवर ‘सी. के. नायडू : डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तकही लिहिले होते, जे १९९५ साली प्रकाशित झाले. चंद्रा या इंदुरमधील शासकीय कन्या महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यात १९८२ साली लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सुवर्ण महोत्सवी कसोटी सामन्याला त्या उपस्थित होत्या.

- Advertisement -

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक चंद्रा यांच्याविषयी म्हणाले की, चंद्रा या इंग्रजीच्या प्राध्यापक होत्या. परंतु, त्यांचे आपल्या राष्ट्रीय भाषेवरही प्रभुत्व होते. त्या हिंदी भाषेत खूप छान समालोचन करायच्या. वडिलांप्रमाणेच त्यांनाही एखादी गोष्ट इतरांपेक्षा आधी म्हणजेच पहिल्यांदा करायची होती. त्यामुळे चंद्रा क्रिकेट समालोचनाकडे वळल्या. त्या खूपच जिद्दी होत्या. त्यांनी आयुष्यात कधीही पटकन हार मानली नाही.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -