Homeक्रीडाKoneru Humpy : डी गुकेशनंतर चेसमध्ये कोनेरू हम्पीने रचला इतिहास; केली ही...

Koneru Humpy : डी गुकेशनंतर चेसमध्ये कोनेरू हम्पीने रचला इतिहास; केली ही कामगिरी

Subscribe

नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांपूर्वीच भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशने बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आता भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीनेदेखील इतिहास रचला आहे. तिने रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. तिने दुसऱ्यांदा ही कामगिरी केली असून याआधी 2019 मध्ये जॉर्जियामध्ये हे पद पटकवले होते. रविवारी (29 डिसेंबर) झालेल्या रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 च्या अंतिम सामन्यात कोनेरू हम्पीने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव केला आणि हे जेतेपद आपल्या नावावर केले. याचसोबत चीनच्या जू वेनजुननंतर हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी हम्पी ही दुसरी खेळाडू ठरली आहे. (India’s Koneru Humpy become Rapid chess world champion for second time)

हेही वाचा : IND vs AUS Test : WTC मध्ये बुमराहने रचला इतिहास; केला हा विक्रम 

- Advertisement -

कोनेरू हम्पीचा विजय हा बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण आहे. नुकतेच भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशने वयाच्या 18 व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आता कोनेरू हम्पीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने 11 फेऱ्यांमध्ये एकूण 8.5 गुण मिळवले होते. रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत तिची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तिने याआधी 2012 मध्ये मॉस्कोमध्ये कांस्य पदक तर 2022 मध्ये उझबेकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

- Advertisement -

कोनेरू हम्पीचे वडील अशोक हम्पीदेखील एक उत्तम बुद्धिबळपटू होते. त्यांनीच कोनेरू हम्पीला बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले आहे. तिचे वडील हे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. वयाच्या 5 व्या वर्षापासून तिच्या वडिलांनी कोनेरूला बुद्धिबळ खेळण्यास शिकवले. सर्वोत्तम बुद्धिबळपटू होण्याचे मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या नोकरीचा त्याग केला आणि कोनेरूला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तिने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळमधील पहिली स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने 12 वर्षांखालील, 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील स्पर्धांमध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -