घरक्रीडाकोरोनामुळे भारतीय संघाचा पुढच्या महिन्यातला श्रीलंका दौरा स्थगित

कोरोनामुळे भारतीय संघाचा पुढच्या महिन्यातला श्रीलंका दौरा स्थगित

Subscribe

याबाबत आयसीसीने गुरुवारी ट्विटद्वारे माहिती दिली.

भारतीय क्रिकेट संघाचा पुढील महिन्यातील श्रीलंका दौरा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे स्थगित करण्यात आला आहे. आयसीसीने गुरुवारी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार होती. महत्त्वाचे म्हणजे टीम इंडिया २४ जून ते ११ जुलै दरम्यान श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी-१० मालिका खेळणार होती. पण कोरोना विषाणूमुळे मालिका स्थगित करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनात एसएलसीने म्हटले की, भारतीय संघाचा जूनमध्ये श्रीलंका दौरा वेळापत्रकानुसार होणार नाही. बीसीसीआयने एसएलसीला सांगितले की, कोरोना विषाणू संबंधित सद्यस्थिती लक्षात घेता तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणे शक्य नाही.

यापूर्वी एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, भारतीय संघ दोन महिन्यात पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसू शकेल. बीसीसीआयने ऑगस्टमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौर्‍यावर येण्यासाठी श्रीलंका क्रिकेटला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती या वृत्तपत्राने दिली होती. मात्र, यासाठी भारत सरकारने परवानगी देणे गरजेचे होते. श्रीलंकेतही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे. तसेच ऑगस्टमध्ये श्रीलंकेत पुन्हा पर्यटनालाही सुरुवात होणार असल्याने या मालिकेसाठी परवानगी मिळेल, अशी श्रीलंका क्रिकेटला खात्री होती. तसेच श्रीलंका आशिया चषक टी-२० स्पर्धेचेही आयोजन करण्यास तयार होती. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार होती.

- Advertisement -

हेही वाचा – शेवटच्या ओव्हर्समध्ये धोनी असा खेळतो की… – राहुल द्रविड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -