Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा अखेर ICCला 'त्या' खेळपट्टीप्रकरणी BCCIचे ऐकावेच लागले; वाचा नेमके प्रकरण काय?

अखेर ICCला ‘त्या’ खेळपट्टीप्रकरणी BCCIचे ऐकावेच लागले; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकताच चार सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेत खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूर, दिल्ली, इंदूर आणि अहमदाबाद या चार ठिकाणी सामने झाले. यापैकी इंदूर कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर आयसीसीने कारवाई केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकताच चार सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेत खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूर, दिल्ली, इंदूर आणि अहमदाबाद या चार ठिकाणी सामने झाले. यापैकी इंदूर कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर आयसीसीने कारवाई केली. मात्र आयसीसीच्या या कठोर निर्णयामुळे बीसीसीआय नाराज झाला आणि इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलण्याचे आवाहन केले. बीसीसीआयच्या आवाहनानंतर आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलले आहे. (Indore Pitch Rating For India Vs Australia Encounter Changed After Bcci Appeal)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

नागपूर, दिल्ली आणि इंदूर येथे झालेले तीन कसोटी सामने तीन दिवसांत संपले. त्यानंतर अहमदाबाद कसोटी सामन्यात फलंदाजांनी धावा केल्या. इंदूर कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर कारवाई करत आयसीसीने सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालाच्या आधारे खेळपट्टीला खराब म्हटले. त्यानंतर तीन डिमेरिट गुण दिले. दरम्यान, आयसीसीच्या या कठोर निर्णयामुळे बीसीसीआय नाराज झालं आणि इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलण्याचे आवाहन केले. बीसीसीआयच्या आवाहनानंतर आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलले आहे. आता आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग सरासरीपेक्षा कमी केले आहे. त्यानुसार, फक्त एक डिमर्जिंग पॉइंट मिळाला आहे.

इंदूरच्या होळकर स्टेडियमला​आयसीसीने तीन डिमेरिट गुण दिले होते. खेळपट्टीबाबत सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांना अहवाल सादर केल्यानंतर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला. यानंतर बीसीसीआयने आयसीसीच्या निर्णयाविरोधात अपील केले.

- Advertisement -

इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व होते. पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. संपूर्ण सामन्यात फिरकीपटूंनी 31 पैकी 26 विकेट घेतल्या. ती कसोटी दोन दिवस आणि एक सत्र चालली, ज्यात ऑस्ट्रेलियन संघ नऊ विकेट्सने जिंकला. इंदूर कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने WTC फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले होते. त्यानंतर काही दिवसांनी टीम इंडियानेही फायनलमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, आयसीसीच्या नियमांनुसार जर एखाद्या मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षांच्या कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स मिळाले, तर त्याला एका वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास बंदी येते. परंतु, आयसीसीने खेळपट्ट्यांचे मूल्यांकन एकूण सहा श्रेणींमध्ये विभागले आहे. यात खूप चांगले, चांगले, सरासरी, सरासरीपेक्षा कमी, खराब आणि अनफिट यांचा समावेश आहे.


हेही वाचा – आम्ही त्याला जोकर म्हणायचो.., ड्रेसिंगरूममधील ख्रिस गेलचा कोहलीने सांगितला किस्सा

- Advertisment -