घरक्रीडाहार्दिक पांड्याला दुखापत, स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर

हार्दिक पांड्याला दुखापत, स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर

Subscribe

आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली.

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना त्याला दुखापत झाली. त्याची पाठ दुखावल्याने त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याची ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

पाठीला झाली दुखापत 

या सामन्यात टॉस जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे सलामीवीर झटपट माघारी परतले. त्यानंतर शोएब मलिक आणि बाबर आझम यांनी चांगली फलंदाजी केली. त्याची विकेट काढण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याला गोलंदाजी दिली. पाकिस्तानच्या डावातील १८ वे षटक पांड्या टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याची पाठ दुखावली. त्यामुळे तो मैदानातच पडला. यानंतर भारताचे फिजिओ पॅट्रिक फरहात यांनी त्याला तपासले. त्यांचे तपासून झाल्यानंतर हार्दिकला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यामुळे तो यापुढे सामन्यात भाग घेईल याबाबत साशंकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -