घरक्रीडाInternational Olympic Committee: महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी IOCचं भारताला आव्हान

International Olympic Committee: महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी IOCचं भारताला आव्हान

Subscribe

दिल्लीत धरणं आंदोलन करत असलेल्या पैलवान मुली आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने उडी घेतली असून समितीनं भारताला थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे भारत या संस्थेची सदस्यता गमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंदोलनप्रकरणी IOCचं भारताला आव्हान

स्वित्झर्लंडच्या लुसानेमधील IOCचे प्रवक्ते यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. तेव्हा ते म्हणाले की, २८ मे रोजी भारतीय कुस्तीपटूंसोबत ज्याप्रकारचं गैरवर्तन करण्यात आलं. तसेच त्यांना मारहाण करण्यात आली आणि अनेक तास त्यांना अटक करण्यात आली. हे अत्यंत दुर्देवीपणाचं लक्षण आहे.

- Advertisement -

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार IOCने आरोपींच्या निष्पक्षतेबाबत सांगितलं की, या कुस्तीपटूंच्या सुरक्षतेबाबत विचार करण्यात यावा. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. आयओसीने पीटी उषाच्या अध्यक्षतेखालील भारतीय ऑलम्पिक असोसिएशन (IOA)ला एक विनंती करण्यात आलीय की, भारतीय कुस्तीपटूंच्या सुरक्षतेसाठी तुम्हीसुद्धा एक पाऊल पुढं उचलावं. तुम्ही या प्रकरणी गप्प का आहात?, दोन ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या आणि भारतीय कुस्तीपटूंसोबत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम IOC करण्यात येणार आहे.

पोलिसांनी कुस्तीमध्ये भारताला मेडल पटकावून देणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, पैलवान बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले. यानंतर आता कुस्तीपटुंनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानुसार, आंदोलक कुस्तीपटू यांनी रक्ताचं पाणी करुन कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला. पण तत्काळ हा निर्णय मागे घेण्यात आला.

- Advertisement -

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कुस्तीगीरपटूंचे आरोपी असलेले भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचं घेण्यात आलं नव्हतं. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलं आहे. परंतु IOC ने सांगितलं की, कुस्तीगीर पटूंनी ज्याप्रकारचे आरोप सिंह यांच्यावर केले आहेत. त्याप्रमाणे त्यांची चौकशी होणं खूप गरजेचं आहे.

आंदोलक कुस्तीपटूंना UWWचा पाठिंबा

अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित आहोत, जिथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध छळ आणि शोषणाचा आरोप करत निदर्शने करत आहेत. आम्ही पाहिले आहे की WFI अध्यक्षांना सुरुवातीला बाजूला केले गेले होते आणि आता ते कुस्तीचे कामकाज पाहत नाहीत, असे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) सांगितले आहे.

आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत बोलू आणि त्यांच्या तक्रारींचे निष्पक्ष आणि न्याय्य निराकरण करण्याच्या बाजूने आहोत. शेवटी आम्हाला पुढील सर्वसाधारण सभेबाबत आयओए आणि तदर्थ समितीकडून माहिती हवी आहे. निवडणुकीसाठी दिलेली 45 दिवसांची मुदत पाळली पाहिजे. त्यातच निवडणुका न घेतल्यास डब्ल्यूएफआय निलंबित केले जाऊ शकते, जेणेकरून खेळाडू तटस्थ ध्वजाखाली खेळतील, असं UWWम्हणाले.


हेही वाचा : कुस्तीपटूंनी पदके विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला मागे, शेतकरी नेत्यांनी काढली समजूत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -