IPL 2022 : बंगळुरूचा दमदार विजय; पराभवामुळे चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहचणं अशक्य

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात मुंबईनतर चेन्नईचा संघ आता प्ले-ऑफमधून आउट झाला आहे. काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात बंगळुरूने 13 धावांनी चेन्नईचा पराभव केला.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात मुंबईनतर चेन्नईचा संघ आता प्ले-ऑफमधून आउट झाला आहे. काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात बंगळुरूने 13 धावांनी चेन्नईचा पराभव केला. बंगळुरूने दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 160 धावाच करता आल्या.

बंगळुरूविरुद्धच्या या पराभवासोबतच चेन्नईचं प्ले-ऑफला पोहोचणं आता जवळपास अशक्य झालं आहे. कारण त्यांच्या खात्यात आता 7 पराभव आहेत. बंगळुरूचा लागोपाठ तीन पराभवांनंतरचा हा पहिला विजय आहे. त्यामुळे त्यांच्या प्ले-ऑफच्या आशा अजूनही कायम आहेत.

बंगळुरूच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात चांगली झाली होती. ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांच्यात 6.4 ओव्हरमध्ये 54 धावांची भागीदारी केली. पण यानंतर बंगळुरूच्या गोलंदाजांनी चेन्नईला वारंवार धक्के दिले. डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 56 धावा केल्या. तसंच, मोईन अलीने 34 आणि ऋतुराज गायकवाडने 28 धावांची खेळी केली.

बंगळुरूकडून हर्षल पटेलला 3 आणि ग्लेन मॅक्सवेलला 2 विकेट मिळाल्या. शाहबाज अहमद, जॉश हेजलवूड आणि वानिंदु हसरंगा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. पहिले बॅटिंग करणाऱ्या बंगळुरूने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 173 रन केले. महिपाल लोमरोरने सर्वाधिक 42 रन तर फाफ डुप्लेसिसने 38 आणि विराटने 33 धावांची खेळी केली. चेन्नईकडून महीश तीक्षणाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय मोईन अलीला 2 आणि ड्वॅन प्रिटोरियसला 1 विकेट मिळाली.


हेही वाचा – ICC ने जाहीर केले रँकिंग, भारत ‘या’ फाॅरमॅटमध्ये अव्वल