आयपीएल २०१९ भारताबाहेर होण्याची शक्यता

भारतात २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका आणि आयपीएल सामन्यांचा तारखा जवळपास आल्याने आयपीएलचे सामने भारताबाहेर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ipl 2019
आयपीएल

भारतीयांचा आवडता खेळ असणाऱ्या क्रिकेटचा सण मानली जाणारी आयपीएल यंदा भारताबाहेर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीसीसीआयने याबद्दलची शक्यता वर्तविली असून सामने दक्षिण आफ्रिका किंवा युनायटेड अरब स्टेट्स (युएई) येथे होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१९ चे आयपीएलचे सामने ९ एप्रिल ते ३ जून दरम्यान होणार आहेत. आयपीएल जागतिक क्रिकेटमधील एक मानाची स्पर्धा असून ती दरवर्षी भारतात होते. मात्र २०१९ मध्ये आयपीएल भारतात न होण्याची शक्यता निर्माण झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांत नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

२०१९ लोकसभा निवडणुका आहेत कारण…

५ वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुका २०१९ ला होणार असून निवडणुकांची तारीख आणि आयपीएल सामने एकाच वेळी होणार आहेत. दोन्ही कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे आणि मोठे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिने बीसीसीआयने सामने भारताबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून निवडणुक आणि आयपीएल अशा दोन्हीला सुरक्षा पुरवणे कठीण असल्याने हा निर्णय घेतला जात आहे.

याआधीही विदेशात पार पडली आयपीएल

२००९ आणि २०१४ सालीही भारतात लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या. तेव्हा देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकार आणि बीसीसीआयने सामने भारताबाहेर ठेवले होते. २००९ साली सामने दक्षिण आफ्रिकेत झाले होते. तर २०१४ साली सामने युनायटेड अरब स्टेट्स (युएई) मध्ये पार पडले होते.

आयपीएलचे पक्के वेळापत्रक हे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठरवण्यात येणार आहे. आयपीएलचे सामने ९ एप्रिल ते ३ जून दरम्यान होणार असून निवडणुकांची तारीख अजून नक्की करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांच्या तारखा नक्की झाल्यानंतरच सामने कुठे होणार हे कळणार आहे.

निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर जर निवडणुकांच्या तारखां आणि आयपीएलच्या तारखां जवळपास असल्यास आयएपीएलचे सामने भारताबाहेर घेऊ, सध्यातरी आम्ही निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहोत – राजीव शुक्ला, आयपीएल अध्यक्ष