अखेर चेन्नईची घोडदौड मुंबईने रोखली

नाणेफेक जिंकूण चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IPL 2019 MI vs CSK live update

आयपीएलच्या १२ व्या मोसमात सलग तीन सामने जिंकत जेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या चेन्नईच्या संघाला आज मुंबईने धुळ चारली आहे. मुंबईने ३७ धावांनी चेन्नईवर मात केली आहे. आयपीएलच्या १२ व्या मोसमात मुंबई विरूद्ध चेन्नई असा खेळला जाणारा हा पहिला सामना होता. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकूण गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे हा सामना खेळला गेला. मुंबईने चेन्नईला १७१ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, चेन्नई २० षटकांत फक्त १३३ धावा करू शकला.

मुंबईचे २० षटकांत १७० धावा

मुंबई इंडियन्सची सुरुवात फार काही चांगली ठरली नाही. मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी-कॉक लवकर बाद झाला. त्याने ७ चेंडूत ४ धावा केल्या. त्यानंतर रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाला. युवराज सिंहही आज फार काही जलवा दाखवू नाही. यानंतर सुर्यकुमार जाधव आणि कृणाल पांड्या यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. सुर्यकुमारने यावेळी अर्धशतक केले. त्याने ४३ चेंडूत ५९ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. परंतु, अखेर ब्राव्होच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार झेलबाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्याही बाद झाला. कृणालने ३२ चेंडूत ४२ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली भागीदारी निभावत ४२ धावा करत २० षटकात मंबईला १७० धावांवर पोहोचवले.