पोलार्डच्या आक्रमक खेळीने डाव पालटला; ३१ चेंडूत तब्बल ८३ धावा

मुंबईने आपले ३ गडी राखत पंजाबला पराभूत केले. यात कायरन पोलार्डने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलार्डने अवघ्या ३१ चेंडूवर ८३ धावा केल्या.

Mumbai Indians vs Kings XI Punjab

कायरन पोलार्डने पंजाबच्या विरोधात आक्रमक फलंदाजी करत मुंबईच्या हातून निसटणारा सामना जिंकून दाखवला. पोलार्डने या सामन्यात उत्कृष्ट खेळी खेळली. पोलार्डने ३१ चेंडूत ८३ दावा केल्या. यामध्ये त्याने तब्बल १० षटकार आणि ३ चौकार मारले. पोलार्डच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सामना जिंकण्यासाठी पोलार्डला शेवटच्या घटकेला अल्झेरी जोसेफने चांगली मदत केली. त्याने १३ चेंडूत १५ धावा केल्या. त्यामुळे मुंबई आपले ३ गडी राखत पंजाबचा पराभव केला.

आज नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई आणि पंजाब यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मोसमातील २४ वा सामना खेळला गेला. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नई आणि मुंबई यांच्यात या १२ व्या मोसमातील हा दुसरा सामना होता. पहिला सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर मोहाली येथे खेळला गेला होता. तो सामना जिंकल्यानंतर पंजाब संघाचा गोलंदाज सॅम करण याने पंजाब संघाची मालकीण प्रिती झंटासोबत भांगडा नृत्य केला होता. त्यामुळे मुंबईने बदला घेणे अपेक्षित होते. मुंबईने त्या पराभवाचा बदला घेतला आहे. ३ गडी राखत पंजाबला मुंबईने पराभूत केले.

नाणेफेक जिंकूण मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबच्या सलामवीरांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धूतला. पंजाबचा ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्यात पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी झाली. विशेष म्हणजे या सामन्यात लोकेशने आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिले शतक केले. तर ख्रिस गेलने अर्धशतक पूर्ण केले. जेसन बेहरनडॉर्फने गेलला बाद केले. यानंतर हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलर आणि करुण नायरला बाद केले. यानंतर जसप्रित बुमराने करण सॅमचा बळी घेतला. त्यामुळे पंजाबच्या धावा अडवण्यात मुंबईच्या गोलंदाजांना कुठेतरी यश आल्याचे पाहायला मिळत होते. परंतु, अखेरच्या दोन षटकांत लोकशने आक्रमक फलंदाजी करत पंजाबची २० षटकातं १९७ धावांपर्यंत मंजल मारुन दिली. त्यामुळे मुंबईसोमर १९८ धावांचे मोठे आव्हान उभे राहिले.