घरक्रीडा९६ धावांत आटोपला हैद्राबादचा खेळ खंडोबा

९६ धावांत आटोपला हैद्राबादचा खेळ खंडोबा

Subscribe

सलग तीन सामने जिंकून आपला विजयरथ जेतेपदाच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या हैद्राबादला मुंबईने ४० धावांनी पराभूत केले. चेन्नई नंतर हैद्राबादची घोडदौड रोखण्यात मुंबईला यश आले आहे.

१३७ धावांचे माफक आव्हान हैद्राबादला पेलता आले नाही. त्यामुळे अवघ्या ९६ धावांवर हैद्राबादचे सर्व गडी तंबूत परतले. आयपीएलच्या १२ व्या मोसमातील हा १९ वा सामना होता. हा सामना हैद्राबादच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. विशेष म्हणजे हैद्राबादने सलग तीन सामने जिंकले आहेत. हैद्राबादचे फलंदाजही तोडीस तोड आहेत. परंतु, या फलंदाजांना धूळ चारण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले. अखेर मुंबईने ४० धावांनी हैद्राबादचा पराभव केला.

हैद्राबादने जिंकले नाणेफेक

हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईला फार काही चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईने २० षटकांत ७ बाद १३६ धावा केले. यामध्ये शेवटच्या घडीला किरण पोलार्डने ४ षटकार आणि २ चौकार लगावले होते.

- Advertisement -

बेअरस्टो आणि वाॅर्नर जोडी लवकर फुटली

हैद्राबादवर विजय मिळवायचा असेल तर सलामीवर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी लवकर फोडायला हवी. हीच बाब मुंबईने हेरली. जाॅनी बेअरस्टॉ लवकर बाद झाला. त्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नरही बाद झाला. त्यानंतर सगळेच काही धावांच्या अंतरावर तंबूत परतले. अखेर ९७ धावांवर हैद्राबादचा गाशा गुंडाळला गेला आणि मुंबईने सामना खिशात घातला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -