घरक्रीडाIPL 2019: मुंबईचा चॅलेंजर्सवर रॉयल विजय

IPL 2019: मुंबईचा चॅलेंजर्सवर रॉयल विजय

Subscribe

बुमराह ठरला मुंबईच्या विजयाचा शिल्पकार

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने रॉयल चॅलेंजर्सवर सहा धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला विजय मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली. मुंबईच्या बुमराहने ४ षटकांमध्ये २० धावा देत ३ बळी घेतले. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने बंगळुर समोर विजया साठी १८८ धावांचे तगडे आव्हान उभ केले. मात्र शेवटच्या षटकांमध्ये बंगळुरचे महत्वाचे फलंदाज बाद झाल्याने २० षटकांमध्ये त्यांना १८१ धावाच करता आल्या. त्यामुळे या हंगामातील वैयक्तीक दुसऱ्या सामन्यात मुंबईने पहिली विजयी सलामा दिली आहे.

कोहलीच्या ५ हजार धावा पूर्ण

१८८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना १४ षटकांमध्ये २ विकेट गमावत ११६ धावांसह बंगळुर संघ मजबूत स्थितीत होता. संघाचा कर्णाधार विराट कोहलीने या सामन्यात ३२ चेंडुत ४६ धावा करत आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्सच्या ऐबी डि विलियर्सने अर्धशतक केले. मात्र शेवटच्या षटकांमध्ये महत्वाचे फलंदाज बाद झाल्याने बंगळुरला पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

बुम्रा, मलिंगाचा अचूक मारा

शेवटच्या चार षटकांमध्ये रॉयल चॅलेंजर्सला ४ षटकांमध्ये ४१ धावांची अवश्यकता होती. २०-२० क्रिकेटमध्ये या धावा करणे सहज शक्य आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवत बुम्राह आणि मलिंगा यांनी अचूक कामरगिरी करत संघाला विजय मिळवुन दिला. १७ व्या आणि १९ व्या शतकात बुमराहने महत्वाचे बळी घेतले. त्याने १७ व्या षटकात केवळ १ धाव देत हेटमायरला बाद केले, तर १९ व्या षटकात केवळ पाच धावा देत कॉलिन डि ग्रैंड होमला बाद केले. शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्सला विजया साठी १७ धावांची अव्यकता होती, मात्र मुंबईच्या लसिथ मलिंगाने आपला पूर्ण अनुभव वापरत गोलंदाजी केली आणि बंगळुरला विजयापासून ६ धावा दुर ठेवले. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे मुंबईची या मोसमातील सुरवात निराशाजनक झाली होती, मात्र रॉयल चॅलेंजर्स विरोधातील अटीतटीच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -